करिअरनामा ऑनलाईन । कितीही उच्च शिक्षण घेतले तरीही (Career Success Story) सध्या देशातील अनेका तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे; हे चित्र तुम्हा-आम्हा सर्वांसाठी काही नवे नाही. सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील नोकऱ्या कमी होत असल्याची अनेकांची तक्रार आहे. उच्च शिक्षण घेवून, पात्रता असूनही अनेकांना नोकरी मिळत नाही ही बाब गंभीर होत चालली आहे. त्यामुळे चांगले शिक्षण घेऊनही अनेक तरुण तरुणींना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहेत. पण अशा परिस्थिती समोर हतबल न होता एका इंजिनिअर तरुणाने हार न मानता एक अनोखा निर्णय घेतला. ही कहाणी तुम्हालाही नक्कीच उपयोगी ठरेल.
नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय सुरु केला
अजय कुमार साह असं या तरुणाचं नाव आहे. करिअरमध्ये सेटल होण्यासाठी या तरुणाने इंजीनिअरींगचे शिक्षण घेतले. उच्च शिक्षण घेवूनही त्याला नोकरी मिळाली नाही. पण अशा परिस्थितीतही नोकरीच्या मागे न धावता त्याने एक अनोखा निर्णय घेतला आहे. इंजिनिअरिंगला राम राम करत या तरुणाने पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. पाहूया त्याच्या प्रवासाची अनोखी कहाणी.
भुवनेश्वरमधून घेतले इंजीनिअरींगचे शिक्षण (Career Success Story)
स्वतःविषयी बोलताना अजय सांगतो; की ” मी गीता ऑटोनॉमस कॉलेज भुवनेश्वर, येथून इंजीनिअरींगचे शिक्षण घेतले. यानंतर खूप प्रयत्न करूनही मला नोकरी मिळाली नाही. नोकरीसाठी वणवण सुरु असताना एक दिवस माझ्या डोक्यात व्यवसाय सुरु करण्याबाबत कल्पना आली आणि मी पाणीपुरीचा स्टॉल सुरू केला. मी दिवसाकाठी फक्त 4 ते 5 तास काम करतो यातून मला दिवसाला 2 ते 3 हजार रुपयांची कमाई होते.”
10 रुपयाला विकतो 4 पाणीपुरी
अजय सकाळी 9 वाजता घरी पाणीपुरीसाठी आवश्यक सामान तयार करायला सुरुवात करतो. वर्षभर तो दोन फ्लेवरची पाणीपुरी विकतो. तर वेगवेगळ्या सीजनच्या फळानुसारही पाणी (Career Success Story) तयार करतो. झारखंडच्या गोड्डा येथील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ तो स्टॉल लावतो. या स्टॉलवर तीन वेगवेगळ्या फ्लेवरच्या पाण्याबरोबरच पाणीपुरीचा मसालाही खास आहे. हा मसाला वाटाणा, हरबरे आणि बटाट्यापासून तयार केला जातो. विशेष म्हणजे याठिकाणी खवय्याना 10 रुपयाला 4 पाणीपुरी मिळतात.
लोकांचा प्रतिसाद वाढतोय
अजय कुमार साह या तरुणाच्या पाणीपुरी स्टॉलला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. इथे पाणीपुरी खायला आलेले खवय्ये सांगतात की, खूप दिवसांपासून ते या स्टॉलवर पाणीपुरी खात येत आहेत. वर्षभरापूर्वी जेव्हा हा स्टॉल भागलपूर रोड याठिकाणी लावला जात होता, तेव्हापासून या स्टॉलवर उत्तम प्रतीची चविष्ट पाणीपुरी मिळते.
पगाराच्या तुलनेत जास्त कमाई
याठिकाणी तीन प्रकारची पाणीपुरी दिली जाते. यामध्ये धणे-पुदिन्याचे (Career Success Story) पाणी, कैरीचे पाणी आणि आंबट-गोड पाणी ग्राहकांना पुरवले जाते. सायंकाळी 4 वाजता हा स्टॉल लावला जातो आणि रात्री 8 वाजेपर्यंत याठिकाणी खवय्यांची गर्दी असते. नोकरी मिळाली नाही म्हणून निराश न होता या तरुणाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला आणि आज तो चांगली कमाई करत आहे.
अजय दररोज 4 तास व्यवसाय करतो; यामधून त्याला दिवसाला 2 ते 3 हजार रुपये मिळतात. या उत्पन्नाची बेरीज केल्यास पाणीपुरीच्या व्यवसायातून होणारी कमाई ही महिनाभर नोकरी करून मिळणाऱ्या पगाराच्या तुलनेत निश्चित जास्त आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com