Career Success Story : गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्वतःची आवड पूर्ण करण्यासाठी करते ‘हे’ काम

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी (Career Success Story) जीवतोड मेहनत करतात. IIT मधून शिक्षण घेतल्यानंतर बहुतांश लोकांचे उद्दिष्ट चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे हे असते. पण या सगळ्यापासून दूर राहून काहीतरी वेगळं करू पाहणारे अनेकजण आहेत. अशीच एक कथा आहे आयआयटी कानपूरची (IIT Kanpur) माजी विद्यार्थिनी प्रियांका गुप्ताची. तिने मल्टी नॅशनल कंपनीमधील कॉर्पोरेटची नोकरी सोडून फिटनेस कोच म्हणून करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. लिंक्डइनवर तिने याबाबत एक पोस्ट केली असून ती व्हायरल होत आहे. पहिल्या स्टार्टअपमध्ये अपयश आल्यानंतरही ती पुढे जात राहिली.

चांगल्या पगाराची नोकरी सोडली (Career Success Story)
प्रियांका गुप्ताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी नोकरी करत असलेली मोठी MNC कंपनी आणि IIT शिक्षणाची जोड सोडली. आता मी व्यावसायिकांना तंदुरुस्त राहण्यास आणि अधिक काळ जगण्यास मदत करते. माझ्यासोबत शिकत असलेल्या अनेक सहकारी आयआयटीयनांनी पदवीनंतर लगेचच आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी स्वप्नांचा पाठलाग सुरू केला. माझ्या कुटुंबाची जबाबदारीही माझ्यावर होती. 5 वर्षांनंतर जेव्हा मी कामातून माझा पहिला ब्रेक घेतला तेव्हा मला कल्पना नव्हती की मी घरी शिजवलेल्या अन्न वितरणाचा व्यवसाय कसा सुरू करेन? “मला घरपोच अन्न वितरणाचा व्यवसाय सुरू करायचा होता पण तो सुरू झाला नाही; त्यामुळे मी पुन्हा 9 ते 5 नोकरी करु लागले. मी या व्यवसायासाठी पुरेसे धैर्य एकवटू शकले नाही.”

कॉर्पोरेट जीवनाचा पाठपुरावा करत असताना, प्रियंका (Career Success Story) तिच्या कम्फर्ट झोनमध्ये स्थायिक झाली पण तिची आवड काहीतरी वेगळं करण्याची होती म्हणून तिने 2012 मध्ये, तिचा पहिला स्टार्टअप सुरू केला. इथला अनुभव निश्चितपणे भयानक होता परंतु हा अनुभव येणं नक्कीच उपयुक्त होतं; असं तिचं म्हणणं आहे.

2020 मध्ये केली Veg Fit ची स्थापना
दिवसेंदिवस सर्वांची जीवनशैली व्यस्त होत चालली आहे. अशा परिस्थितीत प्रियांकाने म्हणते की; “आपण आपल्या आरोग्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. हे फक्त शारीरिक (Career Success Story) तंदुरुस्तीबद्दल नाही तर परिपूर्ण जीवनासाठी शरीर आणि मन निरोगी असणे आवश्यक आहे.”
प्रियांका गुप्ता एक फिटनेस कोच आहे. 2020 मध्ये, तिने ‘Veg Fit’ ची स्थापना केली आहे. या माध्यमातून ती व्यस्त अधिकाऱ्यांना जीवनशैली म्हणून फिटनेस स्वीकारण्यास प्रवृत्त करते. त्यांना उन्नत उत्पादकता, सुधारित जीवन गुणवत्ता आणि वृद्धत्वाची गती कमी करण्यास मदत करते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com