करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट- क सेवा (MPSC Update) मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक टंकलेखक संवर्गाच्या कौशल्य चाचणी करिता अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार आता ज्या उमेदवारांकडे ज्या भाषेचे प्रमाणपत्र आहे त्यांची त्याच भाषेत टंकलेखन कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे. यासोबतच इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांचे प्रमाणपत्र असल्याचे पर्याय निवडलेल्या उमेदवारांच्या भाषेचे प्रमाणपत्र तपासून त्या भाषेची कौशल्य चाचणी घेण्यात येईल; अशी सूचना MPSC ने दिली आहे.
ज्या उमेदवारांकडे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांचे प्रमाणपत्र आहे. त्यांची केवळ मराठी भाषेची टंकलेखन चाचणी घेतली जाईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे. या पदासाठी अर्ज भरताना अनेक उमेदवारांनी भाषेचा पर्याय दिला नव्हता. काही उमेदारांकडे दोन्ही भाषांचे प्रमाणपत्र असल्याने (MPSC Update) त्यांची टंकलेखन कौशल्य चाचणी कुठल्या भाषेत होईल, असाही प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आयोगाने यासंदर्भात सविस्तर सूचना जाहीर केल्या आहेत.
गट-क संवर्गातील ७ हजार ५१० पदांच्या भरतीसाठी परीक्षा (MPSC Update) घेण्यात आली होती. मात्र परीक्षा होऊन चार महिन्यानंतरही निकाल घोषित झाला नव्हता. अखेर कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. मराठी अथवा इंग्रजी अशा ज्या भाषेचे टंकलेखन प्रमाणपत्र आहे त्या भाषेची टंकलेखन कौशल्य चाचणी घेतली जाईल; असं आयोगाने सांगितले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com