करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही 12वी उत्तीर्ण झाला असाल किंवा (Career After 12th) निकालाची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. जर तुम्ही करिअरच्या पर्यायाचा विचार करत असाल तर तुम्ही विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करू शकता. जर तुम्हाला या क्षेत्राबद्दल फारशी माहिती नसेल किंवा तुम्ही पुढे कोणते क्षेत्र करावे याबद्दल संभ्रमात असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो.
सरकारी आणि खाजगी क्षेत्रात करिअरची संधी
असं लक्षात येतं की माहितीचा अभाव असल्याने विमान वाहतूक उद्योगात करिअर करण्याचा विचार फार कमी लोक करतात. पण तुम्ही पायलट बनू शकता आणि आकाशात उंच भरारी (Career After 12th) घेवू शकता. या जॉब प्रोफाइलवर निवड झाल्यानंतर तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता. जर तुम्ही या क्षेत्रात तुमचे करिअर वेळेवर केले तर तुमची करिअर ग्रोथ लवकर होऊ शकते. सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.
काय आहे आवश्यक पात्रता? (Career After 12th)
जर एखादा विद्यार्थी या क्षेत्रात जाण्याचा विचार करत असेल तर त्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह किमान 50 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण केलेली असावी. यानंतर, तुम्हाला कोणत्याही एव्हिएशन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास, तुम्हाला प्रवेश परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि मुलाखत उत्तीर्ण करावी लागेल. एव्हिएशन इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला विमानांशी संबंधित गुंतागुंतीचे शिक्षण दिले जाते. यासोबतच त्याच्या उड्डाण आणि देखभालीचे संपूर्ण प्रशिक्षण दिले जाते.
व्यावसायिक पायलट (Commercial Pilot)
एव्हिएशन इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, आपण व्यावसायिक पायलट म्हणून आपले करिअर सुरू करू शकता. कमर्शिअल पायलट लायसन्स (CPL) साठी तुम्हाला फिटनेस टेस्ट आणि लेखी परीक्षा द्यावी लागेल, जी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला व्यावसायिक पायलट परवाना मिळेल.
हवाई दलात भरती होण्याची संधी
भारतीय हवाई दलात पायलट होऊनही तुम्ही देशाच्या (Career After 12th) सेवेत योगदान देऊ शकता. यासाठी 12वी नंतर तुम्हाला UPSC NDA परीक्षा, एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट (AFCAT), NCC स्पेशल एंट्री स्कीम परीक्षा यापैकी कोणत्याही एका परीक्षेला बसण्यास सांगितले जाते. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय हवाई दल प्रशिक्षण देते. त्याचवेळी भारतीय हवाई दलात पायलटची नोकरी मिळविण्यासाठी उमेदवाराला संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा द्यावी लागते.
इतका मिळतो पगार
वायुसेना अधिकाऱ्याचा पगार 56,100 रुपये दरमहा आहे; तर व्यावसायिक (Career After 12th) पायलट म्हणून तुम्ही दरमहा 1 ते 1.5 लाख रुपये कमवू शकता. या क्षेत्रात जसा अनुभव वाढत जाईल त्याप्रमाणे तुमच्या कमाईतही वाढ होत जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com