करिअरनामा ऑनलाईन । भारतात दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षा (UPSC Success Story) देवून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतात. पण त्यापैकी फक्त एक हजारच उमेदवार त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात. या परीक्षेत कमी वेळात यश मिळवण्यासाठी लाखो उमेदवार कोचिंगची मदत घेतात, मात्र अनेक प्रयत्न करूनही बहुतांश विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवू शकत नाहीत. तर दुसरीकडे असं चित्र पहायला मिळतं की या परीक्षेत एकदा नव्हे तर दोन ते तीन वेळा यश मिळवलेले विद्यार्थी देखील आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणाबद्दल सांगणार आहोत. IAS रवी सिहाग (IAS Ravi Sihag) असं या तरुणाचं नाव आहे. त्यांनी भारतीय नागरी सेवा परीक्षेत सलग तीनवेळा यश मिळवलं आहे आणि ते त्यांच्या बॅचचे हिंदी माध्यमातून टॉपर देखील ठरले आहेत.
दोनवेळा क्रॅक केली UPSC
रवी सिहाग हे मध्य प्रदेश केडरचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी 2021 मध्ये चौथ्या प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा पास केली आणि त्यांनी संपूर्ण भारतातून 18 वा क्रमांक मिळवला आहे. ते त्यांच्या (UPSC Success Story) बॅचचे हिंदी मीडियम टॉपरही ठरले आहेत. 2021 च्या आधीही त्यांनी दोनवेळा नागरी सेवा परीक्षा पास केली आहे. 2018 मध्ये त्यांनी 337 वी रँक मिळवली आणि 2019 मध्ये त्यांनी 317 वी रँक मिळवली आहे. यानंतर त्यांना अनुक्रमे इंडियन डिफेन्स अकाउंट्स सर्व्हिस (IDAS) आणि इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस (IRTS) मध्ये नियुक्ती मिळाली.
तिसऱ्या प्रयत्नात आले अपयश (UPSC Success Story)
रवी सिहाग यांना IAS अधिकारीच व्हायचं होतं, त्यामुळे त्यांनी पुन्हा UPSC परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. पण तिसऱ्या प्रयत्नातही ते UPSC (UPSC) प्रिलिम्स परीक्षा पास करू शकले नाही. त्यांनी हार न मानता पुन्हा परीक्षेचा फॉर्म भरला. 2021 साली परीक्षेच्या चौथ्या प्रयत्नात त्यांनी अखिल भारतीय 18 वा क्रमांक मिळवून IAS पद मिळवले.
शेतकऱ्याच्या मुलाने नाव उंचावले (UPSC Success Story)
रवी सिहाग यांचा जन्म राजस्थानमध्ये झाला आहे. ते मूळचे श्री गंगानगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते एका सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. रवी यांनी अनुपगढच्या शारदा कॉलेजमधून बी. ए. पूर्ण केले आहे. त्यांचे वडील सामान्य शेतकरी आहेत. रवी सिहाग UPSC ची तयारी करण्यापूर्वी पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत वडिलांना शेतीच्या कामात मदत करायचे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com