करिअरनामा ऑनलाईन । नमिता पटजोशी यांची कहाणी (Success Story) संघर्षांनी भरलेली आहे. आयुष्यात आलेल्या अडचणींचा त्यांनी धैर्याने सामना केला आणि यातूनच यशाचा मार्ग तयार झाला. त्या ओडिशाच्या रहिवासी आहेत. नमिता पतजोशी यांचा विवाह 1987 मध्ये झाला होता. त्यांचे पती ओडिशातील कोरापुट जिल्ह्यात महसूल विभागात लिपिक म्हणून काम करत होते. त्यांना फक्त 800 रुपये मासिक पगार होता. एवढ्या कमी पगारात सात सदस्यांचे कुटुंब चालवणे कठीणच होते. 1997 मध्ये नमिता यांनी दागिने गहाण ठेवून एक गाय खरेदी केली आणि दुग्धव्यवसाय सुरू केला. त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि हा व्यवसाय भरभराटीला आला. आजच्या घडीला हा व्यवसाय दीड कोटी रुपयांचा झाला आहे.
कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्वप्न पूर्ण करता येतात. त्याची अनेक उदाहरणं तुम्ही याआधी पाहिली असतील. कधीकाळी पैशांच्या चणचणीमुळे अनेक संकटांना तोंड देणाऱ्या (Success Story) व्यक्ती आज कोट्यधीश झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. अशाच एका जिगरबाज महिलेची सगळीकडे चर्चा होत आहे. या महिलेने जिद्दीने, हिमतीने, संकटांना तोंड देत स्वत:चा व्यवसाय उभा केला आहे आणि आज ही महिला कोट्यधीश बनली आहे.
800 रुपये पगारात घर खर्च भागत नव्हता
संकटांना दोन हात करून स्वत:चा व्यवसाय उभारणाऱ्या या महिलेचे नाव नमिता पटजोशी असे आहे. त्या मुळच्या ओडिसा राज्यातील आहे. 1987 साली त्यांचे लग्न झाले. त्यांचे पती ओडिसातील कोटपूट येथील महसूल विभागात क्लर्क होते. त्यांना तेव्हा प्रतिमहिना 800 रुपये पगार होता. या तोकड्या पगारावर सात जणांचं कुटंब चालवणं त्यांना फारच कठीण होऊन बसलं होतं. नवऱ्याला हातभार म्हणून त्यांनी 1997 साली दागिने गहाण ठेवून एक गाय खरेदी केली आणि दूधविक्रीचा व्यवसाय चालू केला. याच दूध व्यवसायाच्या जोरावर त्या कोट्यधीश झाल्या आहेत.
सोने गहाण ठेवून केली गाय खरेदी (Success Story)
नमिता यांना त्यांच्या कुटुंबासाठी रोज दोन लीटर दूध लागायचे. त्यासाठी त्यांना रोज 20 रुपये खर्च करावे लागत होते. हे पैसे बचत व्हावे म्हणून 1995 साली नमिता यांच्या वडिलांनी त्यांना एक गाय भेट दिली. ही काय रोज चार लीटर दूध द्यायची. मात्र दुर्दैवाने त्यांची ही गाय अचानक हरवली. पुढे दोन वर्षांनी म्हणजेच 1997 साली त्यांनी 5,400 रुपयांची एक क्रॉस ब्रीड गाय खरेदी केली. या गाईच्या खरेदीसाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वत:चे दागिने गहाण ठेवले. ही गाय प्रतिदिन सहा लीटर दूध द्यायची. सुरुवातीला त्या सहा लीटर दुधापैकी दोन लीटर दूध घरी ठेवायच्या आणि उरलेले चार लीटर दूध 10 रुपये प्रतिलीटर दराने लोकांना विकायच्या. दूधविक्रीतून चांगला पैसा मिळू शकतो आणि कुटुंबाला हातभार लागू शकतो, याची कल्पना नमिता यांना आली आणि त्यांनी व्यवसाय पुढे नेण्याचा विचार केला.
‘कंचन डेअरी फार्म’मुळे मिळाला अनेकांच्या हाताला रोजगार
नमिता यांनी दुग्ध व्यवसाय वाढवण्याचे ठरवले. त्या हळूहळू आणखी गाई खरेदी करू लागल्या. 2015-16 साली त्यांनी 50 टक्के अनुदानाच्या मदतीने कर्ज घेतले आणि वेगवेगळ्या गाई (Success Story) खरेदी केल्या. त्यांच्याकडे आज जर्सी, सिंधी आणि होल्स्टीन जातीच्या साधारण 200 गाई आहेत. त्यांनी आता दूधविक्रीचा व्यवसाय जोमात उभारला आहे. नमिता यांनी खरेदी केलेल्या गाई रोज 600 लीटर दूध देतात. त्यांनी आता स्वत:चा ‘कंचन डेअरी फार्म’ उभा केला आहे. त्यांनी आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून 18 आदिवासी महिलांसह एकूण 25 लोकांना रोजगार दिला आहे. त्या हे दूध 65 रुपये प्रतिलीटर (39,000 रोज) दराने विकतात. अतिरिक्त दुधापासून ते पनीर, दही आणि तुपाचीही निर्मिती करतात. त्यांच्या या व्यवसायातून वर्षभरात 1.5 कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यांच्या या यशाची सध्या देशभरात चर्चा होत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com