करिअरनामा ऑनलाईन । नमामी बन्सल यांच्याकडे सिव्हिल सर्व्हिसेस (UPSC Success Story) परीक्षेचे कोचिंग घेण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून तिने कोचिंगशिवायच परीक्षेची तयारी करण्याचं ठरवलं आणि स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. या प्रवासात तिला अनेक अपयशांचा सामना करावा लागला पण ती हरली नाही. यश खेचून आणत संपूर्ण भारतात 17 वा क्रमांक मिळवत ती आयएएस (IAS) अधिकारी बनली. कोणीतरी बरोबरच म्हटले आहे की, ‘जर कोणी आपल्या निर्णयावर ठाम असेल आणि त्याला यशस्वी व्हायचे असेल तर त्याला त्याच्या मार्गावर जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.’ याचं मूर्तिमंत उदाहरण आहे नमामी बन्सल (IAS Namami Bansal). आज आपण तिच्या यशोगाथेविषयी जाणून घेणार आहोत… ज्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये अनेक अपयश येऊनही हार मानली नाही आणि सतत प्रयत्न करून अखेर आयएएस पद मिळवलंच.
वडील भांड्यांचे दुकान चालवायचे (UPSC Success Story)
नमामी बन्सल ही उत्तराखंडच्या ऋषिकेश येथील रहिवासी आहे. नमामीच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांचे वडील राज कुमार बन्सल भांड्यांचे दुकान चालवत होते, यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. याशिवाय नागरी सेवांमध्ये करिअर करण्यासाठी नमामीच्या घरात वेगळे वातावरण नव्हते. तरीही तिने आपले शिक्षण गांभीर्याने सुरू ठेवले.
नमामी यांनी शाळेत नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. तिने नेहमीच प्रत्येक विषयात चांगले गुण मिळवले आहेत. ती पहिल्यापासून वाचनात आणि लेखनात खूप हुशार होती. पण जेव्हा तिने प्रत्यक्षात नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली तेव्हा तिला अनेक अपयशांना सामोरे जावे लागले. नागरी सेवा परीक्षेत (UPSC Success Story) तिला तिनवेळा अपयश आले. तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर त्यांनी कधीही हार मानली नाही आणि ती परीक्षेच्या चौथ्या प्रयत्नात संपूर्ण भारतातून 17 वा क्रमांक घेत UPSC परीक्षा उत्तीर्ण झाली.
ग्रॅज्युएशननंतर केली नोकरी (UPSC Success Story)
नमामी यांचा जन्म ऋषिकेश येथे झाला आणि तिचे प्राथमिक शिक्षणही तिथेच झाले आहे. तिने 10वी मध्ये 92.4 आणि 12वी मध्ये 94.8 गुण मिळवले होते. या कामगिरीमुळे तिच्या संपूर्ण कुटुंबाला तिचा अभिमान वाटत होता. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून पदवी पूर्ण करण्यासाठी ती दिल्लीत आली. येथे तिने अर्थशास्त्राची पदवी प्राप्त केली. ग्रॅज्युएशननंतर तिने काही काळ नोकरी केली आणि नंतर काही कारणांमुळे यूपीएससीकडे आपला मोर्चा वळवला.
कोचिंगशिवाय यश मिळवलं
नमामीसाठी यूपीएससी प्रवास खूपच कठीण होता आणि यामध्ये तिला (UPSC Success Story) यश मिळण्यासाठी अनेक वर्षे लागली. नमामीकडे UPSC कोचिंग घेण्यासाठी महागडे क्लास लावण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, म्हणून तिने कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय या परीक्षेची तयारी सुरू केली. अनेक अडथळे आले तरी तिने कधीही हार मानली नाही आणि अखेरीस तिची चौथ्या प्रयत्नात थेट IAS पदासाठी निवड झाली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com