करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगाने नागरी (UPSC Toppers) सेवा 2023 परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. यंदाच्या निकालात आदित्य श्रीवास्तवने AIR 1 सह, अनिमेश प्रधानने AIR 2 आणि अनन्या रेड्डी ने AIR 3 सह संपूर्ण देशात बाजी मारली आहे. नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये यावर्षी एकूण 1,016 उमेदवारांनी यश मिळवले आहे. आज आपण गेल्या 10 वर्षातील UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेतील टॉपर्स उमेदवार आणि ते सध्या कुठे कार्यरत आहेत याविषयी माहिती घेणार आहोत.
1. इशिता किशोर – 1094 गुणांसह UPSC CSE 2022 मध्ये टॉप केले होते. त्या सध्या त्यांच्या मूळ राज्य उत्तर प्रदेशमध्ये तैनात आहेत.
2. श्रुती शर्मा – 2021 मध्ये 1105 गुणांसह परीक्षेत अव्वल ठरली. श्रुती सध्या उत्तर प्रदेशमध्ये तैनात आहे.
3. शुभम गुप्ता – 2020 मध्ये यांनी 1072 गुणांसह ऑल इंडिया रँक 1 मिळवला. ते त्यांच्या गृहराज्य बिहारमध्ये तैनात आहेत.
4. प्रदीप सिंग – हरियाणातील शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि मोठा झालेला तरुण. यांनी 2019 मध्ये 1072 गुणांसह परीक्षेत अव्वल ठरले होते (UPSC Toppers)
5. कनिष्क कटारिया – हे व्यवसायाने डेटा सायंटिस्ट होते. ज्यांनी 2018 मध्ये UPSC परीक्षेत सर्वाधिक 1121 गुण मिळवले होते. ते सध्या राजस्थानमध्ये तैनात आहेत.
6. अनुदीप दुरीशेट्टी – सलग पाच प्रयत्नांनंतर अखेर 2017 मध्ये अनुदीप दुरीशेट्टी 1126 गुणांसह परीक्षेत अव्वल ठरले. सुरुवातीला त्यांची नियुक्ती मणिपूरमध्ये होती, नंतर त्यांची बिहारमध्ये बदली झाली.
7. अनमोल शेरसिंग बेदी – यांनी २०१६ च्या नागरी सेवा परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांची भारतीय परराष्ट्र सेवेत निवड झाली आहे. (UPSC Toppers)
8. टीना दाबी – यांनी 2015 मध्ये 1063 गुण मिळवत परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. सध्या त्या राजस्थानमध्ये तैनात आहेत.
9. इरा सिंघल (UPSC Toppers) – मणक्याच्या समस्येने ग्रासले असताना त्यांनी हिंमतीने परीक्षा दिली आणि या परीक्षेत त्या टॉपर ठरल्या. अनेकांसाठी प्रेरणा बनून इराने 2014 मध्ये झालेल्या परीक्षेत 1082 गुण मिळवले. त्यांनी AGMUT केडर निवडले. सध्या त्या दिल्ली सरकारमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com