Career Success Story : दुबईतील केमिकल इंजिनिअरची नोकरी सोडून सुरू केला अनोखा व्यवसाय; आता करतो पगाराच्या दुप्पट कमाई

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अलिकडच्या काळात तरुण नोकरी सोडून (Career Success Story) शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकडे वळत आहेत. अशाच एका तरुणाने वेगळा प्रयोग केला आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ही खरं आहे. बिहारमधील एका तरुणाने परदेशातील नोकरीला राम राम करत मायदेशी येवून मधाचा व्यवसाय सुरू केला आहे. पटना येथील रहिवासी असलेल्या झाकी इमाम यांना दुबईत तगड्या पॅकेजची नोकरी होती. या तरुणाने ही नोकरी सोडून मधाच्या क्षेत्रात स्टार्टअप सुरू केले आहे. परदेशातील दीड लाख रुपयांची नोकरी सोडल्यानंतर आता तो महिन्याला तीन लाख रुपयांहून अधिक म्हणजेच पगाराच्या दुप्पट कमावत आहे.

मोठ्या भावासोबत करतो व्यवसाय
मध उत्पादनात बिहार आघाडीवर असलेले राज्य आहे. आज ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण मधमाशी पालनाशी जोडून आपले उत्पन्न वाढवत आहेत. त्याचबरोबर काही तरुण असेही आहेत, जे परदेशात चांगली पॅकेजेस घेऊन आपली नोकरी सोडून मध व्यवसायात उतरत आहेत. सरकारी मदतीतून या भागात (Career Success Story) स्टार्टअप सुरू केले जात आहेत. पाटण्यातील रहिवासी झाकी इमामची कथाही अशीच आहे. तो दुबई आणि ओमानमध्ये काम करायचा. मात्र गेल्या काही वर्षांपासून पाटणा, बिहारला आपली कर्मभूमी बनवून तो आपल्या मोठ्या भावासोबत मधाचा व्यवसाय करत आहे.

इमाम ब्रदर्स नावाने सुरू केला स्टार्टअप
झाकी इमाम यांचा भाऊ फजल इमाम याने बिहार सरकारच्या स्टार्टअप धोरणाच्या मदतीने इमाम ब्रदर्स कंपनीच्या नावाने एक स्टार्टअप सुरू केला आहे. झाकी हे या कंपनीचे संचालक आहेत. सुमारे दोन वर्षांपासून मध व्यवसायाशी ते संबंधित आहेत. या स्टार्टअप मधून विविध प्रकारचे मध गोळा करण्याबरोबरच मधापासून अनेक प्रकारचे पदार्थही बनवले जात आहेत. नैसर्गिक उत्पादने लोकांना उपलब्ध करून देण्याचे त्यांचे ध्येय असल्याचे झाकी सांगतात.

कोरोना काळानंतर सुरु केला मध व्यवसाय, कंपनीचे मूल्य आहे 40 लाख
झाकी इमाम हे बिहारच्या पाटणा शहरातील फुलवारी शरीफ भागातील मुळ रहिवासी आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर झाकी दुबई आणि ओमानमध्ये केमिकल इंजिनिअर म्हणून काम करत होते. पाच वर्षे दुबईत नोकरी केल्यानंतर झाकी हे कोविडच्या काळात घरी परतले. मायदेशी प्रतल्यानंतर झाकी हे (Career Success Story) मधाच्या व्यवसायात गुंतले. काही महिने त्यांनी मधाचा व्यवसाय केला. पण कोरोना संपल्यानंतर ते पुन्हा एकदा ओमानला गेले. मात्र, दोन महिने काम करुन ते पुन्हा मायदेशी परतले. यानंतर त्यांनी मधाचा व्यवसाय सुरु केला. फेब्रुवारी 2022 मध्ये स्टार्टअप म्हणून मधाचा व्यवसाय सुरू करण्यात आला. या स्टार्टअपला काही दिवसांपूर्वी बिहार सरकारच्या उद्योग विभागाकडून ग्रीन सिग्नलही मिळाला आहे. गेल्या नऊ महिन्यांत कंपनीचे मूल्य 40 लाखांवर पोहोचले आहे.

मध व्यवसाय हा कमाईचा उत्तम पर्याय (Career Success Story)
आज मध व्यवसाय हा कमाईसाठी चांगला पर्याय आहे. त्यासाठी फक्त लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. कधी कधी आमच्या या निर्णयाचा वडिलांना खूप राग यायचा पण आज आम्ही व्यवसायात केलेली प्रगती पाहून वडिलांना आमचा अभिमान वाटतो. आज तो माझे ऑफिस नातेवाईकांना आणि इतर लोकांना आवर्जून दाखवतात.

स्टार्ट अपमधून तयार केली जातात अनेक हर्बल उत्पादने
झाकी इमाम सांगतात; “मधाच्या क्षेत्रात बऱ्याच गोष्टी करता येतात. त्याबद्दल फक्त लोकांना माहिती देण्याची गरज आहे. ते शेतकऱ्यांकडून ब्लॅकबेरी, तुळस, लिची आणि ड्रमस्टिकपासून मिळणारा मध विकत घेतात. यासोबतच त्यापासून अतिरिक्त पदार्थही बनवले जातात. आवळा मुरब्ब्यात साखरेऐवजी मध (Career Success Story) घालून बाजारात विकला जातो. यासोबतच आल्यामध्ये मध आणि हळद मिसळून विकले जाते. आम्ही अशा प्रकारची हर्बल उत्पादने बाजारात उपलब्ध करून देत आहोत. पन्नासहून अधिक शेतकरी आमच्यासोबत काम करत आहेत. यासोबतच आम्ही या व्यवसायातून अनेक लोकांना रोजगार देत आहोत.” एकेकाळी परदेशात दरमहा दीड लाख रुपये पगार घेणारे झाकी आता मध व्यवसायात उतरून दर महिन्याला पगारापेक्षा दुप्पट कमाई करत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com