करिअरनामा ऑनलाईन । २०२२ मध्ये घेण्यात (MPSC Update) आलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर आहे. या निकालात ‘सारथी’ पुणे मार्फत राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा प्रशिक्षण उपक्रमातील 175 विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) मार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्ष्यित गटातील होतकरू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देऊन पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत निःशुल्क प्रशिक्षणाची संधी देण्यात आली होती. यामध्ये सारथीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
कोणत्या जिल्ह्यातून किती विद्यार्थी (MPSC Update)
सारथी संस्थेतील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी पुणे जिल्हा ३६, सोलापूर जिल्हा २२, अहमदनगर २१, सातारा १४, सांगली ११, धाराशिव ९, छत्रपती संभाजीनगर ८, बीड ८, कोल्हापूर ६, लातूर ६, बुलडाणा, नांदेड व परभणी जिल्ह्यांतील प्रत्येकी ४, जळगाव, ठाणे जिल्ह्यांतील प्रत्येकी ३, अमरावती, धुळे, जालना, मुंबई व रायगड जिल्ह्यांतील प्रत्येकी २ व अकोला, गडचिरोली, नागपूर, नाशिक व रत्नागिरी जिल्ह्यांतील प्रत्येकी एक विद्यार्थ्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा निवड यादीत नाव सामील झाले आहे.
सारथीच्या विद्यार्थ्यांनी ‘या’ पदांवर मारली बाजी (MPSC Update)
यशस्वी १७५ विद्यार्थ्यांपैकी १३ विद्यार्थ्यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे. ८ विद्यार्थी तहसीलदार पदावर, ४ विद्यार्थी शिक्षणाधिकारी पदावर, ४ विद्यार्थी गटविकास (MPSC Update) अधिकारी पदावर, ९ विद्यार्थी पोलिस उपअधीक्षक पदावर, १९ विद्यार्थी सहायक आयुक्त राज्यकर पदासाठी अशा प्रकारे ७५ विद्यार्थ्यांची निवड वर्ग एकच्या पदासाठी व १०० विद्यार्थ्यांची निवड वर्ग दोनच्या पदांसाठी झाली आहे.
दरम्यान सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर (भा. प्र. से. सेवा निवृत्त अधिकारी) यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रशासन करून देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे; अशा शुभेच्छा व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिल्या आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com