करिअरनामा ऑनलाईन । जून महिन्यात नव्या शैक्षणिक वर्षाच्या (Big News) प्रवेश प्रक्रियेला सुरवात होईल. यावेळी पूर्व प्राथमीक मधील प्ले ग्रुप/नर्सरी, लहान गट, मोठा गट यामध्ये नेमक्या कोणत्या वयोगटातील बालकांचा प्रवेश घ्यायचा, याबाबत पालकांमध्ये संभ्रम पहायला मिळतो. आता या पालकांची शाळाप्रवेशाची चिंता प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दूर केली आहे. ‘आरटीई’ (Right to Education) नुसार खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना असणाऱ्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये बालकांचे शाळा प्रवेशाचे किमान वय किती असावे, हे यापूर्वीच निश्चित केले आहे. प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे बालकांच्या किमान आणि कमाल वयोगटानुसार त्यांना कोणत्या इयत्तेत प्रवेश दिला जावा हे आता स्पष्ट करण्यात आले आहे.
2024-25 मध्ये बालकांच्या प्रवेशासाठी वय मर्यादा अशी असेल (Big News)
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमधील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार, प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी ३१ डिसेंबर २०२४पर्यंत किमान तीन वर्षे आणि कमाल चार वर्षे पाच महिने, तर इयत्ता पहिलीसाठी किमान सहा वर्षे आणि कमाल सात वर्षे पाच महिने अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करताना, जुलै ते डिसेंबरमध्ये जन्मलेल्या बालकांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी दि. 31 डिसेंबरपर्यंतचे वय ग्राह्य धरण्यात (Big News) येते. या संदर्भात सप्टेंबर 2020 मध्येच निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या आधारेच बालकांची वयोमर्यादा निश्चित केल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com