करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा पास होण्यासाठी (UPSC Success Story) उमेदवारांना कठोर परिश्रम घ्यावे लागतात. देशातून दरवर्षी लाखो लोक या परीक्षेची तयारी करतात आणि परीक्षेला बसतात. पण प्रत्येकालाच यश मिळतं असं नाही. आज आम्ही तुम्हाला अशा एका अधिकाऱ्याबद्दल संगणार आहोत जीने अनेक अपयशाचा सामना केला तरीही या अपयशाचं भांडवल न करता ती शेवटपर्यंत लढत राहिली आणि शेवटी तिने यश मिळवलंच.
मॉडेलिंगमध्ये करायचं होतं करिअर (UPSC Success Story)
मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तस्किन खानची ही गोष्ट आहे. IAS अधिकारी तस्किन खान या माजी ‘मिस डेहराडून’ आणि ‘मिस उत्तराखंड’ देखील राहिल्या आहेत. त्यांनी UPSC पास होण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले. या परिक्षेत सतत अपयश येवूनही UPSC परीक्षा तिने पास केली आणि ती आयएएस (IAS) अधिकारी बनली आहे.
अभ्यासात हुशार नव्हत्या
IAS तस्किन (IAS Taskeen Khan) यांना मॉडेल बनायचे होते; पण आर्थिक अडचणींमुळे हे ध्येय पूर्ण होवू शकले नाही. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. त्या अभ्यासात फार हुशार नव्हत्या. त्यांना गणित विषयाची खूप भीती वाटत होती. मात्र, 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत तस्किन यांनी विज्ञान शाखेत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते. अभ्यासासाठी योग्य रणनिती आखण्याचं महत्त्व त्यांना माहीत होतं. त्यांनी मनाशी पक्क केलं आणि आपला सगळा वेळ अभ्यास करण्यात घालवला. शेवटी मेहनत फळाला आली आणि त्या चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास झाल्या.
‘मिस इंडिया’ व्हायचं होतं
IAS तस्किन खानने मॉडेलिंगमध्ये स्वत:चे चांगले नाव (UPSC Success Story) कमावले होते. आयुष्यात एकदा तरी मिस इंडियाचा किताब पटकवायचा हे स्वप्न त्यांनी पहिलं होतं. पण हे स्वप्न अर्ध्यातच सोडून त्यांनी यूपीएससीचा मार्ग निवडला. तस्किन यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेत तीनदा नापास झाल्या. पण त्यांनी हार मानली नाही आणि चौथ्या प्रयत्नात त्या UPSC परीक्षा पास झाल्या.
घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीला सामोरं जात मिळवलं यश
यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी तस्किन (IAS Taskeen Khan) मुंबईत आल्या आणि जामियाच्या मोफत प्रवेश परीक्षेद्वारे त्यांनी प्रशिक्षण घेतले. नंतर त्या 2020 मध्ये दिल्लीला राहायला गेल्या. घरची आर्थिक (UPSC Success Story) परिस्थिती चांगली नसतानाही त्यांनी अधिकारी होण्याचा निर्णय घेतला आणि UPSC 2022 च्या परीक्षेत संपूर्ण भारतात 736 वा क्रमांक मिळवला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com