MPSC Update : 2025 पासून राज्यसेवेची परीक्षा लेखी स्वरूपातच होणार; पहा बातमी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात (MPSC Update) येणारी राज्यसेवेची परीक्षा 2025 पासून लेखी स्वरूपातच घेतली जाणार आहे. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना हा पर्याय स्वीकारणे गरजेचे आहे. संगणकीय क्षेत्रात वाढ होत असून या पुढील काळात मुख्य परीक्षा सोडून सर्व परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याचा आयोगाचा मानस असून ती प्रक्रिया लवकरच होईल; असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी रविवारी पुण्यात बोलताना स्पष्ट केले.

अर्हम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्यातर्फे आयोजित ‘संवाद टॉपर्स मार्गदर्शन -राज्यसेवा परीक्षेला सामोरे जाताना…’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अर्हम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शैलेश पगारिया, वास्तव कट्टयाचे किरण निंभोरे, महेश बडे उपस्थित होते.

किशोरराजे निंबाळकर पुढे म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या माध्यमातून कर्तव्यदक्ष अधिकारी निवडत असतात. काही विद्यार्थी अशी मागणी करतात की, एकच उमेदवार अनेक पदांवर नियुक्ती मिळवतो. त्यामुळे आमच्यावर अन्याय होतो. तसेच एखादा उमेदवार वरिष्ठ पद मिळवत असेल तर त्यांच्यावर (MPSC Update) निर्बंध घालू नका पण एखादा वारिष्ट पदावरून कनिष्ठ पदावर येत असेल तर त्यांच्यावर निर्बंध घाला,अशी मागणी होत असते. या मागणीवर विचार होणे गरजेचे आहे.तसेच प्रशासनात येऊन प्रशासन खराब करू नका.जनसेवा हीच लोकसेवा आहे.हे समजून आपण काम करणे गरजचे आहे,असा सल्लाही किशोर राजे निंबाळकर यांनी उमेदवारांना दिला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com