करिअरनामा ऑनलाईन । तरुण महिला अधिकारी चंद्रज्योती सिंह यांनी अवघ्या 22 व्या वर्षी IAS अधिकारी होवून कमी वयात मोठी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर त्यांनी देशातील ही कठीण परीक्षा पास केली आहे. 2019 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 28 वी रॅंक मिळवून हे यश मिळवलं आहे. अभ्यासातील योग्य रणनितीमुळे हे यश मिळवता आलं असल्याचं चंद्रज्योती यांचं म्हणणं आहे. त्यांच्या आई-वडिलांनी आर्मीमध्ये सेवा बजावली आहे त्यामुळे देशसेवेचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. म्हणूनच चंद्रज्योती (IAS Chandrajyoti Singh) यांनी शालेय जिवनापासूनच सरकारी सेवेत सामील होण्याचं ठरवलं . आज आपण त्यांच्या IAS होण्याच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.
अवघ्या 22 व्या वर्षी पास केली परीक्षा
सर्वांनाच माहीत आहे की, UPSC कडून घेतली जाणारी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इच्छुक उमेदवार रात्रंदिवस मेहनत करत असतात. मात्र यामध्ये लवकर यश मिळवणे हे प्रत्येकाच्या आवाक्यात नसते. काही लोकांना वर्षानुवर्षे अनेक प्रयत्न करून मार्ग बदलावा लागतो, तर काही लोक या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात. IAS अधिकारी चंद्रज्योती सिंह यापैकीच एक आहेत. त्यांनी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी ही परीक्षा पास केली आहे.
कोचिंग क्लास न लावता केला सेल्फ स्टडी
चंद्रज्योती यांचे वडील दलबारा सिंग हे निवृत्त आर्मी रेडिओलॉजिस्ट आहेत आणि त्यांची आई मीना सिंग यांनी देखील सैन्यात सेवा केली आहे. पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चंद्रज्योती (IAS Chandrajyoti Singh) यांनी एक वर्षाचा ब्रेक घेतला आणि यूपीएससी (UPSC) सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली. यासाठी कोणतेही प्रशिक्षण न घेता त्यांनी फक्त स्वतःवर विश्वास ठेवला आणि सेल्फ स्टडीच्या जोरावर त्या फक्त पास झाल्या नाहीत; तर त्यांनी संपूर्ण देशात 28 वा क्रमांक मिळवून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.
दररोज 10 तासापेक्षा जास्त अभ्यास
चंद्रज्योती सुरवातीला दररोज 6 ते 8 तास परीक्षेच्या (UPSC Success Story) तयारीसाठी देत असे. परीक्षेची वेळ जसजशी जवळ आली, तसतसे त्यांनी 10 तास किंवा त्याहून अधिक तास अभ्यासासाठी दिले. यासोबतच चंद्रज्योती दररोज न चुकता वर्तमानपत्र वाचायच्या. यामुळे त्यांची चालू घडामोडींची तयारी उत्तम झाली. वर्तमानपत्र वाचण्याच्या या सवयीमुळे त्यांना परीक्षा पास करणे खूप सोपे झाले.
काय आहे यशाचा मंत्र (UPSC Success Story)
UPSC इच्छुकांना सल्ला देताना IAS चंद्रज्योती सिंह म्हणतात की कोणत्याही परीक्षेत यश मिळवण्यासाठी योग्य रणनीती बनवणे आणि त्यानुसार तयारी करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी आखलेल्या रणनीतीनुसार उमेदवारांनी तयारी केली, तर यश नक्कीचमिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com