करिअरनामा ऑनलाईन । “साधारण 2015 पासून मी परीक्षेची (MPSC Success Story) तयारी करीत होते. 2020 मध्ये परिक्षेत पास झाल्यानंतर सहाय्यक निबंधक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माझं लग्न झालं आहे. लग्नानंतरही घर-संसार सांभाळत मी राज्यसेवेची तयारी सुरु ठेवली आणि अभ्यासात सातत्य ठेवले. त्याचे फळ मला मिळाले आहे. कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळाल्यामुळेच नोकरी सांभाळत यश मिळवता आले आहे”; हे संगत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात मुलींमधून अव्वल ठरलेली पूजा वंजारी.
सहा वेळा अपयश आल्यानंतर सातव्या प्रयत्नात मिळाले यश
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल काही दीवसापूर्वी जाहीर झाला आहे. एकूण 613 पदांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत विनायक पाटील याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच पूजा अरुण वंजारी हिने 570.25 गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये पिंपरी- चिंचवडची पूजा वंजारी अव्वल आली आहे. एमपीएससी परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आलेली पूजा वंजारी ही मूळची सांगली जिल्ह्यातील आहे. लग्नानंतर ती पिंपरी चिंचवड येथे राहण्यासाठी आली. सहा वेळा अपयश आल्यानंतर सातव्या प्रयत्नात पूजा वंजारीने हे यश मिळवलं आहे. इतकचं नाहीतर ती मुलींमध्ये राज्यात पहिली देखील आली.
पूजाचा आत्मविश्वास आणि पतीचा खंबीर पाठिंबा (MPSC Success Story)
पूजा हिला कुटुंबातून शैक्षणिक आणि शेतकरी पार्श्वभूमी लाभली आहे. तिला आपण अधिकारी होऊ शकतो यावर ठाम विश्वास होता. त्यामुळे या परिक्षेत सहा वेळा अपयश आल्यानंतरही तिने प्रयत्न सोडले नाहीत. सातव्या वेळी पूजा यश संपादन करू शकली आणि नुसती पास नाही तर ती राज्यात मुलींमध्ये पहिली आली. यामध्ये पूजाला तिच्या पतीचा खंबीर पाठिंबा मिळाला. स्पर्धा परीक्षेसाठी पती खंबीरपणे पाठीशी उभे राहिले, असं पूजा आवर्जून सांगते.
अभियांत्रिकी सोबत केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास
2014 मध्ये जेव्हा पूजा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती तेव्हा तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. ती सांगते; जेव्हा मी निकाल पाहिला तेव्हा मला खूप आनंद झाला. माझे (MPSC Success Story) स्वप्न पूर्ण झाल्याने आनंदाला पारावार उरला नाही. माझ्या यशात माझे कुटुंब तसेच माझ्या सासरच्या मंडळींचा हातभार आहे. मी दररोज सुमारे आठ तास अभ्यास करायचे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे आहे.”
यशापेक्षा अपयश जास्त बघावं लागतं
ती सांगते; “कोणतीही स्पर्धा परीक्षा देताना यशापेक्षा अपयश जास्त बघावं लागतं हे तितकंच खरं आहे. ते माझ्या बाबतीतही खरं ठरलं आहे. एमपीएससी परीक्षेत मला सहावेळा अपयश आलं होतं. मात्र मी न थांबता प्रयत्न सुरुच ठेवले. 2019 या वर्षी स्पर्धा परीक्षा देताना यामध्ये मला केवळ 13 गुण कमी पडले आणि पुन्हा दुर्दैवाने ही संधी हुकली. त्यानंतर मी कसून तयारी केली आणि 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये पहिला येण्याचा मान मिळवला आहे.”
जीद्द आणि चिकाटीचे उत्तम उदाहरण
2015 आणि 2016 या दोन्ही प्रयत्नात पूर्वपरीक्षेत पूजा पास होवू शकली नाही. त्यानंतर 2017 मध्ये पूजाने मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली मात्र तिला तिथे यश मिळालं नाही. 2018 मध्ये पूजाला पुन्हा पूर्वपरीक्षेत अपयशाला सामोरं जावं लागलं. हा निकाल पाहिल्यानंतर तासाभरातच तिने (MPSC Success Story) अभ्यासाला सुरुवात केली होती. यामधून कळतं की पूजा जिद्द आणि चिकाटीचे उत्तम उदाहरण आहे. 2019 मध्ये झालेल्या परीक्षेत पुजाला 13 गुण कमी पडले आणि पुन्हा तिची संधी हुकली. अखेर 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत तिने बाजी मारलीच.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com