How to Become Marcos Commando : यांच्या नावाने शत्रूचाही उडतो थरकाप!! कसं व्हायचं ‘मार्कोस कमांडो’? पहा संपूर्ण माहिती 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । खरं तर, काही दिवसांपूर्वी (How to Become Marcos Commando) मार्कोस कमांडोंनी उत्तर अरबी समुद्रात एका मोठ्या जहाजातून 15 भारतीयांसह 21 क्रू मेंबर्सची प्राण पणाला लावून सुटका केली होती. अशा परिस्थितीत हे मरीन फोर्स कमांडो पुन्हा चर्चेत आले आहेत. या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की हे मार्कोस कमांडो कोण आहेत; ज्यांच्या नावाने शत्रूचा थरकाप उडतो….
आपल्या देशाची तिन्ही सैन्य दले शत्रूचा सुपडा साफ करण्यासाठी पुरेशी आहेत. गेल्या काही वर्षांत भारतीय लष्कराचे वेगळे रूप जगाने पाहिले आहे. लष्कराच्या विशेष कमांडोबाबत या ना त्या कारणाने चर्चा रंगत असतात. अशातच गेल्या काही दिवसांपासून भारतीय नौदलाचे मरीन म्हणजेच मार्कोस कमांडोज चर्चेत आले आहेत.

सर्वात शक्तिशाली कमांडोज
मार्कोस कमांडोची रचना अमेरिकन नेव्ही सील्सच्या धर्तीवर करण्यात आली आहे. भारतीय नौदलाच्या या विशेष युनिटची स्थापना फेब्रुवारी 1987 मध्ये झाली. हे कमांडो नॅशनल (How to Become Marcos Commando) सिक्युरिटी गार्ड, गरुड, पॅरा कमांडो, फोर्स वनचे भाग आहेत. भारतीय नौदलाच्या मरीन कमांडो फोर्समध्ये सर्वात धाडसी सैनिक असतात, जे नेहमी द्रुत आणि गुप्त प्रतिक्रियेसाठी तयार असतात, जे सागरी ऑपरेशन्स आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी नेहमीच तयार असतात.

The Few, The Fearless
“The Few, The Fearless” हे मार्कोस कमांडोचे ब्रीद वाक्य आहे, जे त्यांच्या लढाऊ कौशल्यासाठी आणि शौर्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय नौदलाचे हे विशेष युनिट अमेरिकन नेव्ही सील आणि ब्रिटीश स्पेशल बोट सर्व्हिस (एसबीएस) च्या धर्तीवर विकसित केले गेले आहे, जे अग्नि, वायु, पाणी आणि जमीन याद्वारे कोणतेही ऑपरेशन यशस्वी करण्यात पटाईत असतात. त्यांच्या व्यावसायिकतेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाणारे हे मरीन कमांडो सैनिक मार्कोस म्हणूनही ओळखले जातात.

मार्कोस कमांडो होण्यासाठी काय करावं लागतं?
मार्कोस कमांडो फोर्समध्ये सामील होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मार्कोस कमांडो हे कुशल आणि गुप्त कमांडो (How to Become Marcos Commando) म्हणून ओळखले जातात, ज्यांचे प्रशिक्षण अत्यंत आव्हानात्मक असते. केवळ काही उमेदवारच पात्रतेची अंतिम फेरी गाठू शकतात.

आवश्यक पात्रता आणि वय मर्यादा (How to Become Marcos Commando)
मार्कोस कमांडोसाठी अर्ज करणारे उमेदवार नौदलातील नाविक किंवा अधिकारी असणे आवश्यक आहे, ज्यांचे वय 20 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
किती मिळतो पगार?
– मरीन कमांडोचा पगार 7 व्या केंद्रीय वेतन आयोगाद्वारे (CPC) ठरवला जातो.
– मूळ वेतन दरमहा रु 25,000/- असू शकते.
– शिप ड्रायव्हिंग भत्ता – रु 8,500/- ते रु. 10,000/-
– मार्कोस भत्ता – रु 25,000/-

वेगवेगळ्या पोस्टिंग क्षेत्रांसाठी इतका मिळतो भत्ता
1. अवघड भागात त्यांच्या मूळ वेतनाच्या अतिरिक्त 20 टक्के रक्कम दिली जाते.
2. तसेच अत्यंत सक्रिय क्षेत्रात पोस्टिंगवर भत्ता उपलब्ध आहे – रु. 16,900/-
3. फील्ड एरिया (How to Become Marcos Commando) कर्मचार्‍यांना फील्ड एरिया भत्ता मिळतो – रु. 10,500/-
4. शांतता क्षेत्र भत्ता – रु. 35,500/-
5. फील्ड एरिया भत्ता – रु. 16,900/-
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com