How to Become Air Hostess : तुम्हाला एअर होस्टेस बनायचंय?? किती असते कोर्स फी? सुरुवातीलाच मिळतं लाखोंचं पॅकेज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एअर होस्टेसची नोकरी हा एक (How to Become Air Hostess) करिअरचा उत्तम पर्याय ठरू शकतो. अनेक तरुणींना एअर होस्टेसची नोकरी करण्याची इच्छा असते. जर तुम्हाला उच्च शिक्षण घेण्याकडे जास्त रस नसेल तर 12वी पास झाल्यानंतर विद्यार्थिनींसाठी हा एक चांगला पर्याय आहे. आज आम्ही तुम्हाला एअर होस्टेस कोर्सशी संबंधित सर्व महत्वाची माहिती देणार आहोत. तुम्ही हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला एअरलाइन कंपनीमध्ये नोकरीच्या सुरुवातीला लाखो रुपयांचे पगाराचे पॅकेज सहज मिळू शकते जेणेकरुन तुम्ही तुमचे करिअर सेट करु शकता.

एवढं शिक्षण घेतलेलं असावं
एअर होस्टेस होण्यासाठी इयत्ता १२वीमध्ये ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण असणे आवश्यक आहे. तसेच जर तुम्ही पदवीधर असाल तर अशा मुलीही या क्षेत्रात आपले करिअर करू शकतात.
एअर होस्टेस होण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक असतात
ज्या तरुणींना एअर होस्टेस व्हायचं आहे त्यांच्याकडे हिंदीसोबतच इंग्रजीवरही चांगले प्रभुत्व असणे गरजेचे आहे. तसेच जर तरुणांना एक किंवा अधिक परदेशी भाषा चांगल्या प्रकारे अवगत असतील, तर या क्षेत्रात झटपट आणि चांगली प्रगती होण्यासाठी ही एक जमेची बाजू ठरू शकते.

किती असते फी (How to Become Air Hostess)
साधारणत: एअर होस्टेस कोर्सची फी 2 लाख ते 2.5 लाख रुपयांपर्यंत असते. अनेक संस्थांमध्ये ही फी कमी किंवा जास्त असू शकते.
आवश्यक शारीरिक पात्रता
बहुतांश संस्था 17 ते 26 वयोगटातील तरुणींना एअर होस्टेस बनण्याची संधी देतात. उमेदवारांची किमान उंची 157 सेंटीमीटर असावी. याशिवाय उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि आकर्षक असावा. फिटनेस चाचणीमध्ये समाविष्ट असलेल्या साइट्स देखील तपासल्या जातात. एअर होस्टेसच्या नोकरीसाठी दृष्टीची शक्ती कमीत कमी 6/9 असणे आवश्यक आहे.

कुठे मिळते नोकरीची संधी? पगार किती मिळतो?
एअरलाइन्स कंपन्या वेळोवेळी एअर होस्टेस पदांच्या रिक्त जागांची जाहिरात काढतात. लेखी परीक्षा, गटचर्चा आणि वैयक्तिक मुलाखतीमधील कामगिरीच्या आधारे उमेदवारांची (How to Become Air Hostess) निवड केली जाते. पगाराबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला कोणत्याही एअरलाइनमध्ये एअर होस्टेस म्हणून सुरवातीला 5 ते 10 लाख रुपयांचे पॅकेज सहज मिळू शकते. त्याचवेळी 10 वर्षे किंवा त्याहून अधिक अनुभव असलेल्या एअर होस्टेसना 50 लाख किंवा त्याहून अधिकचे पॅकेज मिळू शकते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com