UPSC Success Story : त्याने रिस्क घेतली… दिवसा ऑफिस आणि रात्री केला अभ्यास; IAS होण्यासाठी सोडली मायक्रोसॉफ्टची नोकरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । IAS किंवा IPS होण्याचे आकर्षण (UPSC Success Story) असे आहे की, यासाठी तरुण चांगल्या पगाराची नोकरी सोडतात आणि UPSC मधून अधिकारी होण्यासाठी स्वतःला झोकून देतात. ज्या क्षेत्रात काहीही निश्चिती नाही; अशा ठिकाणी ते मोठी रिस्क घेताना दिसतात. माधव भारद्वाज हा तरुण यापैकीच एक आहे.

लहानपणी ठरवलं होतं इंजिनिअर व्हायचं
माधव हा उत्तराखंडमधील मसुरी येथील रहिवासी आहे. त्याने लहानपणापासून ‘लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी’ (LBSNAA) बद्दल ऐकले आणि पाहिले होते. माधव सांगतो की, त्याचे वडील LBSNAA येथे काम करायचे. त्यामुळे या ऐतिहासिक संकुलाची त्याला लहानपणापासूनच माहिती होती. पण IAS होण्या ऐवजी इंजिनियर होण्याचे स्वप्न त्याने पाहिले आणि 12वी नंतर प्रयागराज येथील MNNIT मध्ये B.Tech Computer Science ला प्रवेश घेतला.
बी.टेक.ची पदवी घेतल्यानंतर माधवने आयआयएम अहमदाबादमधून एमबीए (MBA) केले. यानंतर त्याने मायक्रोसॉफ्ट या आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपनीत उत्पादन व्यवस्थापक म्हणून नोकरी मिळवली. 2020 मध्ये जेव्हा कोरोना महामारीने जगाला वेठीस धरले आणि लॉकडाऊन लागू झाले तेव्हा त्याला बराच काळ घरी राहून काम करावे लागले.

वर्क फ्रॉम होम करताना वाटू लागलं IAS व्हावं 
घरातून काम करत असताना माधवच्या मनात आयएएस (IAS) होण्याची इच्छा निर्माण झाली. यानंतर त्याने करिअरची दिशा बदलण्याचं ठरवलं आणि UPSC नागरी (UPSC Success Story) सेवा परीक्षेची मनापासून तयारी सुरु केली. त्याने या परीक्षेसाठी अपार मेहनत घेतली. पण परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात केवळ तीन गुण कमी पडल्यामुळे त्याची ही संधी हुकली.

अपयशाने निराश झाला नाही (UPSC Success Story)
यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात इतक्या कमी फरकाने अपयश आल्याने त्याला धक्का बसला पण तो निराश झाला नाही. निराश होण्याऐवजी त्याने आत्मविश्वास वाढवला. त्याने पुन्हा आपला मोर्चा पुढच्या परीक्षेकडे वळवला आणि अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले.

दिवसा ऑफीस आणि रात्री केला अभ्यास 
माधवने UPSC साठी दुसऱ्यांदा फॉर्म भरला. यावेळी त्याने पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेऱ्या सहज पूर्ण केल्या. UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये त्याने संपूर्ण भारतात 536 वी रँक मिळवली. माधव सांगतो की तो दिवसा ऑफिसची कामे करायचा आणि रात्री चार ते पाच तास परीक्षेचा अभ्यास करायचा. जेव्हा ऑफिसच्या कामाला सुट्टी असेल तेव्हा तो 10 ते 12 तास अभ्यास करायचा. एवढयावर न (UPSC Success Story) थांबता परीक्षेच्या शेवटच्या दिवसांत त्याने तब्बल 15 ते 16 तास अभ्यास केला आहे. शेवटी त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले आणि त्याचे IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले. तर असा होता माधव याचा B.Tech इंजिनिअर ते भारतातील सर्वोच्च सरकारी अधिकारी पदावर पोहचण्याचा प्रवास. त्याची ही कहाणी तरुण पिढीसाठी निश्चितच आशावादी ठरेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com