UPSC Success Story : याला म्हणतात जिद्द!! तीनवेळा संधी हुकली पण हरली नाही; IAS बनून वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंच

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शालेय जीवनापासूनच कोणाला (UPSC Success Story) डॉक्टर बनायचं असतं तर कोणाला इंजिनियर. आयुष्यात प्रत्येकाने एक स्वप्न पहिलेलं असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असते. अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यामध्ये तुम्ही चांगले करिअर करु शकता. तर असे काही लोक आहेत जे आयुष्यात खूप आनंदी असतात तरीही त्यांना अजून काहीतरी मिळवायचं असतं. त्यांची ही इच्छा त्यांना लोकांच्या गर्दीपासून वेगळे ठेवते. आयएएस अधिकारी मुद्रा गायरोला यापैकीच एक आहे. आज आपण तिच्या विषयी जाणून घेणार आहोत.

शाळेत टॉपर विद्यार्थी म्हणून ओळख (UPSC Success Story)
मुद्रा गायरोला ही लहानपणापासूनच हुशार मुलगी म्हणून ओळखली जायची. तीला अभ्यासात खूप रस वाटायचा. ती परिक्षेत नेहमी चांगले गुण मिळवायची त्यामुळेशाळेत ती नेहमी टॉपर विद्यार्थीनी म्हणून ओळखली जायची. मुद्राला 10वी बोर्डाच्या परीक्षेत 96 टक्के आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळाले होते. तिच्या शालेय जीवनात, तिला भारताच्या पहिल्या महिला IPS किरण बेदी यांनी सन्मानित केले आहे.

मुंबईत घेतले मेडिकलचे शिक्षण
मुद्रा ही उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयाग येथील रहिवासी आहे. सध्या तिचे कुटुंब दिल्लीत राहते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुद्राने वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. तिने मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयात बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी कोर्सला प्रवेश घेतला. कॉलेजच्या अभ्यासातही तिने टॉप केले आणि बीडीएसमध्ये सुवर्णपदक मिळवले. नंतर तिने दिल्लीला येऊन एमडीएसमध्ये (MDS) प्रवेश घेतला, पण तिने आयएएस अधिकारी व्हावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती.

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केली जोरदार तयारी
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुद्राने एमडीएसचे (MDS) शिक्षण अर्धवट सोडले आणि यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी केली. 2018 मध्ये मुद्राने UPSC चा पहिला प्रयत्न केला, ज्यामध्ये ती मुलाखत फेरीपर्यंत पोहोचली. 2019 मध्ये ती पुन्हा UPSC च्या मुलाखत फेरीत पोहोचली, परंतु तिची निवड झाली नाही. यानंतर ती 2020 मध्ये मुख्य परीक्षाही पास करु शकली नाही.
शेवटी बाजी मारलीच
IAS मुद्रा गायरोला 2021 मध्ये पुन्हा UPSC परीक्षेला बसली. यावेळी (UPSC Success Story) तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले आणि ती आयपीएस (IPS) झाली. मुद्राने पुन्हा आयएएस होण्याचा प्रयत्न केला. तिने पुन्हा परीक्षा दिली आणि 2022 मध्ये ती संपूर्ण भारतातून 53 व्या रँकसह UPSC पास झाली आणि ती IAS बनण्यात यशस्वी झाली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com