Career in Merchant Navy : मर्चंट नेव्हीमध्ये असं घडवा करिअर; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मर्चंट नेव्ही हे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये केवळ (Career in Merchant Navy) सरकारी नोकऱ्याच नाही तर खाजगी क्षेत्रातही भरपूर नोकऱ्या उपलब्ध आहेत. मर्चंट नेव्हीची व्याप्ती खूप विस्तृत मानली जाते. मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीसोबतच तुम्ही वेगवेगळ्या देशांत फिरण्याचे तुमचे स्वप्नही पूर्ण करू शकता. यामध्ये व्यापारी जहाजांद्वारे एका ठिकाणाहून किंवा देशातून दुसऱ्या ठिकाणी किंवा देशात मालाची वाहतूक केली जाते. जर तुमचंही मर्चंट नेव्हीमध्ये भरती होण्याचं स्वप्न असेल, तर आम्ही त्यासंबंधित सर्व माहिती देत ​​आहोत, ज्याद्वारे तुम्ही या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकू शकता.

काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
1. या क्षेत्रात जाण्यासाठी तुम्ही 12वी किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळविण्यासाठी किंवा अधिकारी होण्यासाठी, तुम्ही प्रथम भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) विषयांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (Career in Merchant Navy)
3. यासोबतच उमेदवाराचे किमान वय 17 वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
4. मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी होण्यासाठी, बारावीनंतर, उमेदवार मरीन इंजिनीअरिंगमध्ये बीटेक, मेकॅनिकल इंजिनीअरमध्ये बीई, नॉटिकल सायन्समध्ये बीएस्सी असे विविध अभ्यासक्रम करू शकतात.
5. याशिवाय या क्षेत्रात पदविका अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत, जे पूर्ण करून तुम्ही या क्षेत्रातील तुमच्या करिअरला नवी दिशा देऊ शकता.

अशी आहे निवड प्रक्रिया (Career in Merchant Navy)
1. मर्चंट नेव्हीमध्ये निवड होण्यापूर्वी उमेदवारांना लेखी परीक्षा/स्क्रीनिंग टेस्ट/मुख्य परीक्षा/मुलाखत इत्यादी विविध टप्पे पार करावे लागतात.
2. या सर्व प्रक्रियेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी द्यावी लागते.
3. सर्व टप्प्यांत यशस्वी झालेल्या उमेदवारांना अंतिम गुणवत्ता यादीत स्थान दिले जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com