UPSC Success Story : या तरुणाने स्वतःचं नशीब स्वतःच लिहलं; रस्त्यावर बूट विकणारा मुलगा असा झाला IAS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जे गरिबीला मार्गातील सर्वात मोठा (UPSC Success Story) अडथळा मानतात त्यांच्यासाठी IAS शुभम गुप्ता हे उत्तम उदाहरण आहे . तुम्हाला पटणार नाही; शुभम हा त्याच्या वडिलांसोबत बूट आणि चप्पल विकण्याचे काम करायचा. हा मुलगा मोठा होऊन एक दिवस अधिकारी होईल, असे कुणाला वाटले नसेल; पण शुभमने ते करून दाखवले. त्याने   स्वतःचे नशीब स्वतः लिहिले आणि UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या कुटुंबाला अभिमान वाटेल; अशी कामगिरी केली.

सामान्य कुटुंबात झाला जन्म
शुभम महाराष्ट्र केडरचा IAS अधिकारी आहे. शुभम गुप्ता हा मूळचा राजस्थानचा आहे. त्याचा जन्म 11 ऑगस्ट 1993 रोजी सीकर जिल्ह्यातील भूडोली गावात एका सामान्य कुटुंबात झाला. वडील अनिल गुप्ता यांनी शुभमला सामान्य मुलाप्रमाणे वाढवले. शुभम आर्थिकदृष्ट्या संपन्न नव्हता. कंत्राटी कामावर त्याचा घरखर्च चालत होता.

शुभम असा झाला IAS अधिकारी (UPSC Success Story)
शुभम सातवीत शिकत होता, तेव्हा उत्पन्नाअभावी त्याच्या वडिलांना राजस्थानहून महाराष्ट्रात यावे लागले. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू रोडवर चप्पलचे दुकान थाटले. शाळा सुटल्यानंतर वडिलांना मदत करण्यासाठी शुभम दुकानावर जात असे.
दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकानाची संपूर्ण जबाबदारी शुभमच्या खांद्यावर होती. लहान वयात त्याला असे काम करताना पाहणाऱ्यांपैकी कोणाला वाटले नसेल की हा मुलगा मोठा होऊन IAS अधिकारी होईल. पण इथे शुभमची जिद्द कामी आली. असं म्हणतात की जे कष्ट करतात ते कधीच हारत नाहीत; ते लढतच राहतात; शुभमच्या बाबतीतही तेच घडलं.

3 वेळा अपयश पण चौथ्या प्रयत्नात मिळाले यश
शुभमने शिक्षण घेत काम केले. कामाचा ताण आला तरी कधी (UPSC Success Story) त्याने जिद्द सोडली नाही. समोर येणाऱ्या सर्व अडथळ्यांवर मात करत त्याने अभ्यासही सुरू ठेवला. 2012 ते 2015 मध्ये दिल्ली विद्यापीठातून बीए आणि नंतर एमए पूर्ण केल्यानंतर, त्याने स्वत: ला UPSC परीक्षेसाठी तयार केले. पहिल्या 3 वेळेस त्याला अपयश आले मात्र चौथ्या प्रयत्नात त्याने यश खेचून आणले. आज तो देशातील एक सुप्रसिद्ध आयएएस (IAS) अधिकारी आहेत आणि तरुणांसाठी उर्जेचा स्त्रोत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com