करिअरनामा ऑनलाईन । UPSC किंवा MPSC मध्ये यश मिळवण्याचे (UPSC Success Story) स्वप्न जवळजवळ प्रत्येक उमेदवार पाहतो आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर प्रयत्न करतो. पण प्रत्येकाला पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असं होत नाही. काहीजण पहिल्या प्रयत्नात; काही दुसऱ्या प्रयत्नात तर काहींना परीक्षेच्या शेवटच्या प्रयत्नाची वाट पहावी लागते. IAS अधिकारी रम्या यापैकीच एक आहे. रम्याने 2021 मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परिक्षेत संपूर्ण भारतात 46 वा क्रमांक पटकावला आहे. हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. रम्याला तिचे ध्येय गाठण्यासाठी कोणत्या कसोट्या पार कराव्या लागल्या ते पाहूया…
कठीण परिस्थितीत आईने संगोपन केलं
रम्या मूळची कोईम्बतूरची रहिवासी आहे. तिच्या आयुष्यात (UPSC Success Story) अनेक चढ-उतार आले. शिक्षण घेण्यासाठी तिला लहानपणापासून खूप संघर्ष करावा लागला. रम्याची घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. कठीण परिस्थितीत तिला तिच्या आईने लहानाचे मोठे केले. आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी राम्याने लवकरात लवकर आपल्या पायावर उभे राहण्याचं ठरवलं आणि तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. घरची आर्थिक स्थिती सामान्य करण्यासाठी तिने डेटा एन्ट्री ऑपरेटरची नोकरी केली. तिने 10 वीच्या परीक्षेनंतर पॉलिटेक्निक डिप्लोमाला प्रवेश घेतला. डिप्लोमाचा अभ्यास करत असताना तिला जाणवले की केवळ चांगले शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकतो.
UPSC च्या अभ्यासासाठी नोकरी सोडली
डिप्लोमा सुरु असतानाच तिला तिच्या प्राध्यापकांनी सांगितले की, सध्या तुझ्यासाठी नोकरी मिळणे सोपे आहे पण नोकरी करत असताना पुढील शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे फार कठीण आहे. रम्या प्राध्यापकांच्या बोलण्याने खूप प्रभावीत झाली आणि डिप्लोमा करत असताना मिळालेल्या चांगल्या गुणांच्या (UPSC Success Story) जोरावर तिने कोईम्बतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला नोकरी लागली आणि बघता बघता प्रमोशनही मिळाले. यानंतर तिने इग्नूमधून MBA चे शिक्षण पूर्ण केले. पण नोकरी करुनही राम्याला जी शांतता हवी होती ती मिळत नव्हती. 2017 मध्ये तिने नोकरी सोडून दिली आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली.
पूर्व परिक्षेत सलग 5 वेळा आले अपयश
रम्याचा यूपीएससीचा प्रवासही खाच खळग्यांनी भरलेला होता. तिने अनेक वेळा परीक्षेचा फॉर्म भरला आणि तयारी केली. पहिल्या पाच प्रयत्नांपैकी एकाही प्रयत्नात ती पूर्वपरीक्षा (UPSC Success Story) पास करु शकली नाही. रम्याने अपयशानंतरही हार मानली नाही. तिला आलेल्या आपयशातून तिने बोध घेतला. ती म्हणते की तिच्या UPSCच्या प्रवासात तिची आई नेहमीच तिच्यासोबत राहिली. परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी रम्या म्हणते की, “तुम्ही स्वतःला कधीही कमकुवत समजू नका, जरी अपयश आले तरी ते पचवून पुढे जाण्याची तयारी ठेवा. एकना एक दिवस यश नक्कीच तुमच्या हातात असेल.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com