करिअरनामा ऑनलाईन । उत्सव लहानपणापासूनच (UPSC Success Story) अभ्यासात हुशार होता. त्याला 10वीत 91.8 टक्के आणि 12 वीत 87.6 टक्के गुण मिळाले होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने आयआयटी, पाटणामधून बॅचलर पदवी मिळवली. ग्रॅज्युएशन पूर्ण होताच उत्सवला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली. पण त्याला UPSC ची परीक्षा द्यायची होती म्हणून त्याने नोकरी सोडली. आज त्याच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ही कहाणी रंजक आणि प्रेरणादायी आहे.
UPSC परीक्षा दिल्या नंतर मिळणाऱ्या सरकारी नोकरीचे आकर्षण तरुणांना स्वस्थ बसू देत नाही. यासाठी अनेकजण लाखो रुपये पगाराच्या नोकऱ्या सोडायला तयार होतात. आयएएस (UPSC Success Story) अधिकारी उत्सव गौतम यांचीही अशीच कहाणी आहे. IIT मधून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर सुमारे एक वर्ष त्यांनी नोकरी केली. त्यानंतर आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. मात्र, यानंतर त्याला अनेक अपयशांना सामोरे जावे लागले.
एकापाठोपाठ तीनवेळा आले अपयश (UPSC Success Story)
UPSCची परीक्षा देण्याचा विचार उत्सवच्या मनात आला. यानंतर त्याने नोकरीचा राजिनामा दिला आणि अभ्यासाला सुरुवात केली. संघर्ष संपत नव्हता. त्याला एकापाठोपाठ अनेक अपयशांना सामोरे जावे लागले. उत्सवने UPSC मध्ये सलग तीन प्रयत्न केले. तिन्ही वेळेस त्याला अपयश आले. पण उत्सव निराश झाला नाही. त्याने सकारात्मक विचाराने तयारी सुरुच ठेवली. मागील परीक्षांमध्ये झालेल्या चुका ओळखून त्या सुधारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या चिकाटीचा परिणाम म्हणजे त्याने 2017 मध्ये चौथ्या प्रयत्नात UPSC पास होण्यात यश मिळवले.
अभ्यासक्रमाची भरपूर उजळणी करा
उत्सव फक्त UPSC पास झाला नाही; तर त्याने या परिक्षेत संपूर्ण भारतातून 33 वा क्रमांक मिळवला आहे. त्याचे नाव टॉपर्सच्या यादीत झळकत आहे. UPSC ची तयारी करणाऱ्यांना (UPSC Success Story) उत्सव सांगतो की, “संपूर्ण अभ्यासक्रम वाचून भरपूर उजळणी करा. या परीक्षेसाठी पुस्तकांची निवड अत्यंत विचारपूर्वक करावी लागते. मानक पुस्तकांव्यतिरिक्त, NCERT ची पुस्तके नक्कीच वाचा.” असा सल्ला तो देतो.
या परीक्षेसाठी उत्सवचा ऐच्छिक विषय गणित हा होता. तो म्हणतो; “UPSC चा कोणताही पेपर हलका घेऊ नका. पण मुख्य परीक्षेसाठी ऐच्छिक विषयांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. मी ऐच्छिक विषय कधीच बदलला नाही. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आणि सकारात्मक विचारासोबतच संयमही आवश्यक आहे.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com