करिअरनामा ऑनलाईन । फक्त नोकरी मिळवली म्हणजे (Learn Foreign Language) करिअरमध्ये आपण यशस्वी झालो असे होत नाही. नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाले तर पूर्वीसारखे आता राहिले नाही. पदवी घेतली आणि नोकरी मिळाली असं आताच्या जमान्यात होत नाही.आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी नव्याने शिकण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे यशस्वी करिअर घडवण्यासाठी तुमच्या अंगी विविध कला असणे आवश्यक आहे.
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तुम्हाला विविध परदेशी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. परदेशी भाषांपैकी एखाद्या भाषेचे ज्ञान तुम्हाला अवगत असेल तर तुम्हाला विदेशात ही नोकरीच्या भरपूर संधी निर्माण होतील.
भाषेचे ज्ञान घेतल्यामुळे बदलतो दृष्टीकोन (Learn Foreign Language)
जर तुम्हाला विविध भाषांचे ज्ञान अवगत असेल तर तुमचा जगाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन तयार होतो. तुम्ही फ्रेंच भाषा शिकता, जर्मनी शिकता की जपानी भाषा शिकता; यावरून त्या त्या देशातील गोष्टी समजून घेणं तुमच्यासाठी सोपं होतं. याबरोबरच कोणत्याही वातावरणाशी तुम्ही स्वत:ला जुळवून घेऊ शकता. भाषेचे ज्ञान असल्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. तुम्ही थेटपणे त्या भाषेत त्या प्रांतातील लोकांशी अगदी सहज संवाद साधू शकता. त्यामुळे तिथे नोकरी करणंही सोपं जातं.
इथे मिळतात नोकरीच्या संधी
जर तुम्हाला परदेशी भाषांचे ज्ञान अवगत असेल तर तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी निर्माण होवू शकतात. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध भाषा अवगत असणाऱ्या लोकांना मागणी असते. विदेशात अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत, इथे नोकरी मिळवताना तुम्हाला भाषेचे ज्ञान अवगत असल्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. भाषा अनुवादक म्हणून ही तुमच्यासाठी करिअरची नवी संधी निर्माण होऊ शकते.
व्यक्तिमत्वाला पडतात पैलू (Learn Foreign Language)
बहुभाषिक असणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळाच बदल आणि एक वेगळीच चमक आपणास दिसून येते. शिवाय, एकापेक्षा अधिक भाषा अवगत असल्यामुळे, नोकरीच्या क्षेत्रात विविध संधी निर्माण होतात. तुमच्या बोलण्याची शैली सुधारण्यास मदत होते. तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com