करिअरनामा ऑनलाईन । भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (Career Success Story) यांनी दिलेल्या शिकवणीनुसार, ‘स्वप्न अशी बघा, जी तुम्हाला झोपू देणार नाहीत.’ प्रिती चंद्रा यांनी ही शिकवण सार्थ करुन दाखवली आहे. प्रिती चंद्रा या पत्रकार होत्या. पत्रकारिता करत असताना त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचं मनाशी ठरवलं. आयपीएस अधिकारी होऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न रात्री झोपेत पाहिलेले स्वप्न नव्हते. तर उघड्या डोळ्यांनी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची वाटचाल सुरु होती. प्रिती चंद्रा यांचा हा प्रवास म्हणजे जिद्दीचे जिवंत उदाहरण आहे.
रोज करावा लागत होता नव्या आव्हांनाचा सामना
प्रिती या आधी शिक्षिका आणि नंतर पत्रकार म्हणून काम करत होत्या. पत्रकारिता करत असताना रोज नव्या आव्हानांचा सामना त्यांना करावा लागत होता. या जोडीला रोजच्या आयुष्यातील संघर्षही होताच, पण त्यांची जिद्द कमी होत नव्हती. त्यांना IPS अधिकारी व्हायचं होतं. खूप मेहनत घेवून त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण केले. हे स्वप्न जागेपणी दृश्यनिश्चयाने पाहिलेले स्वप्न होते.
परीक्षा पास होणं सोपं नव्हतं (Career Success Story)
UPSCची परीक्षा देणं काही सहज सोपं नाही. अहोरात्र घेतलेली मेहनत, अभ्यास, स्मार्ट स्टडी, परीक्षा देताना येणाऱ्या आव्हानांवर मात या सर्व गोष्टी पार केल्यानंतर UPSC परीक्षा पास होता येते. प्रिती यांना या सर्वांची कल्पना होती. पत्रकार म्हणून कार्यरत असतानाची आव्हाने, घरची सामान्य परिस्थिती आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणी या सर्वावर त्यांनी मात केली. त्यांच्याकडे परिस्थितीला जुळवून घेण्याची ताकद आणि चिकाटी होती.
प्रिती चंद्रा यांची उल्लेखनीय कामगिरी पाहूया…
1. प्रिती चंद्रा या मूळ राजस्थानच्या कुंदन गावातील आहेत. त्यांचा जन्म १९७९ साली झाला. घरची परिस्थिती बेताचीच होती. मुलींना शिक्षण देणारा समाज आसपास नव्हता. त्यांचे शालेय शिक्षण सरकारी शाळेत झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण जयपूरच्या महाराणी कॉलेजमध्ये झाले. प्रिती चंद्रा यांनी एम.ए, एमफिलपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आधी शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले, नंतर त्या पत्रकार म्हणून काम करत होत्या.
2. प्रिती यांच्या घरचे शिक्षित नव्हते. त्यांच्या आईचे शिक्षणही कमीच झाले होते. तरीही त्यांनी आपल्या मुलीला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.
3. उच्च शिक्षित प्रिती यांचा विवाह वरिष्ठ पोलीस अधिकारी विकास पाठक यांच्याशी झाला.
4. पत्रकार म्हणून काम करत असताना त्यांनी UPSC परीक्षा देण्याचे ठरवले. या परिक्षेत त्यांनी संपूर्ण देशातून 255 वा क्रमांक मिळवला. यूपीएससीसाठी त्यांनी कोणतीही शिकवणी लावली नाही. स्वतः अभ्यास करुन त्यांनी या परिक्षेत यश मिळवले आहे. हे यश मिळवल्यानंतर त्यांनी अनेक उच्च पदे भूषविली आहेत. त्यांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. यामुळे त्यांना ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखले जाते.
5. कर्तव्यदक्षता, प्रामाणिकता आणि सचोटीने काम करण्याची वृत्ती ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी विविध पदे भूषवली आहेत. एएसपी (ASP) म्हणून अलवरमध्ये, एसपी (SP) म्हणून कोटा येथे तर बुंदीमध्ये एसपी म्हणून त्या कार्यरत होत्या. बुंदी येथे लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीचा त्यांनी पर्दाफाश (Career Success Story) केला. हरिया गुर्जर आणि राम लखना या कुख्यात गुन्हेगारांना त्यांच्या नेतृत्वाखाली शोधण्यात यश आले. या घटनेनंतर त्यांना ‘लेडी सिंघम’ म्हटले जाऊ लागले.
6. करौली येथे त्या एसपी म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गुन्हेगारांना पकडले आहे. करौली शहर गुंड आणि जुगारी लोकांसाठीच प्रसिद्ध होते. हे गुंड चोऱ्या करून, अपहरण करून लपण्यासाठी अन्यत्र जात. प्रिती यांनी या सर्वांवर लक्ष ठेवले. कडक योजना आखून त्यांनी अनेक जुगारी आणि गुन्हेगारांना तुरुंगाची हवा खायला लावली.
7. परिस्थितीपुढे हतबल होणारी (Career Success Story) आजची पिढी आहे. त्यांच्यासाठी ‘लेडी सिंघम’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या IPS प्रिती चंद्रा यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे. घरची बिकट परिस्थिती, दैनंदिन आयुष्यातील आव्हाने या सर्वांवर मात करत, कोणत्याही शिकवणीचा आधार न घेता त्यांनी UPSC परिक्षेत नशीब आजमावले आहे. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. तुमहयातील जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्ती तुम्हाला नक्कीच यशाच्या शिखरावर पोहचवते; हे यातून सिद्ध होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com