UPSC Success Story : दिवसभर नोकरी अन् रात्री अभ्यास… इंजिनिअर तरुणीने पहिल्याच झटक्यात क्रॅक केली UPSC

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आज आपण बोलत आहोत (UPSC Success Story) नेहा बॅनर्जीबद्दल. विशेष म्हणजे नेहाने नोकरी करत असतानाच  UPSC परीक्षेची तयारी केली. 2019 मध्ये तिने पहिल्यांदाच परीक्षा दिली. नोकरी बरोबरच परीक्षेची तयारी करत असताना ती फक्त पास झाली नाही; तर तिने या परिक्षेत संपूर्ण भारतात 20 वी रँक मिळवली आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले…

वडिलांच्या निधनानंतर आईने संगोपन केले
2011 मध्ये जेव्हा नेहाच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा तिच्या आईने तिला एकल पालक म्हणून वाढवले. नेहा पहिल्यापासून अभ्यासात हुशार होती. 2018 मध्ये तिने IIT खरगपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. अभियांत्रिकी नंतर, तिला नोएडामधील एका कंपनीत नोकरी मिळाली.
ती म्हणते की तिच्यासाठी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहणं महत्वाचं होतं, त्यामुळे तिने नोकरी सोडण्याचा विचार केला नाही. नोकरीसोबतच तिने UPSC परीक्षेची तयारी सुरु ठेवली. दिवसभर ऑफिसमध्ये काम करुन घरी आल्यानंतर ती अभ्यास करत असे. एकीकडे नोकरी आणि एकीकडे अभ्यास असा तिचा प्रवास सुरु होता.

पहिल्याच प्रयत्नात परिक्षेत मारली बाजी (UPSC Success Story)
ही परीक्षा देण्यासाठी नेहाने 2019 मध्ये पहिलाच प्रयत्न केला. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, “सुरुवातीला मी थोडी नर्व्हस होते. त्यामागचे कारण होते इंजिनिअरिंग पार्श्वभूमी. वर्तमानपत्र वाचून मी अभ्यासाची तयारी सुरू केली. मला  वर्तमानपत्रे वाचनाची आवड आणि सवय लागली. काही दिवसाने मला UPSC चा अभ्यासक्रम आणि तयारीची पद्धत लक्षात आली. हळुहळू इतिहास, भूगोल, जनरल स्टडी, राज्यशास्त्र इत्यादी नवीन विषय समजू लागल्याने थोड्याफार प्रमाणात माझी काळजी कमी होवू लागली. नोकरी करत असताना अभ्यासाचे केलेले योग्य नियोजन, आणि कठोर परिश्रम या सूत्रामुळे मला हे यश मिळवता आले.”

मुलाखतीच्या 15 दिवस आधी सोडली नोकरी 
नेहा सांगते की, पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, मुलाखत हा तिच्यासाठी शेवटचा टप्पा होता. यासाठी तिने मुलाखतीच्या 15 दिवस आधी नोकरी सोडली आणि मुलाखतीच्या (UPSC Success Story) तयारीवर लक्ष केंद्रित केले. एका व्हिडिओ मुलाखतीत नेहाने सांगितले की, “मला मुलाखतीत पॅनेलने एक अवघड प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता, विज्ञान किंवा धर्मात कोण मोठे आहे? जेव्हा मी सांगितले की दोन्ही भिन्न क्षेत्रे आहेत, तेव्हा मुलाखत घेणार्‍याने सांगितले की विज्ञान तर्कावर आधारित आहे आणि धर्म तुमच्या श्रद्धेशी संबंधित आहे. तुम्ही कोणाला मोठे मानता?”

नेहा सांगते की, मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या माध्यमातून तुमच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेतली जाते. यावेळी मी समतोल उत्तर देण्याचा प्रयत्न केला. विज्ञान आपल्याला वेगळ्या मार्गाने पुढे घेऊन जाते आणि धर्म आपल्याला वेगळ्या मार्गाने शक्ती देतो. हे मी दिलेले उत्तर पॅनेलला आवडले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com