करिअरनामा ऑनलाईन । शालेय किंवा महाविद्यालयीन (Career Tips for College Students) जीवनात तुम्ही पाया जितका मजबूत कराल तितकंच तुम्ही उंच उडाण घेवू शकता. यशस्वी भविष्यासाठी, करिअरचे नियोजन पद्धतशीरपणे करणे खूप महत्वाचे आहे, त्यामुळे व्यक्तीला तिच्या ध्येयाबाबत संभ्रम निर्माण होत नाही. केवळ काही लोकच करिअरच्या बाबतीतील त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतात, तर बहुसंख्य लोक आपल्या ध्येयापासून लांब जात केवळ जगण्यासाठी कोणतीही नोकरी किंवा काम करण्यास भाग पडतात.
आयुष्यात तोच यश मिळवू शकतो जो स्वत:ला समजून घेतो आणि आपल्या जीवनाचा उद्देश जाणून घेतल्यानंतर पूर्ण समर्पणाने काम करतो. हे साध्य करण्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा लागतो. सरतेशेवटी यश त्याच्या पायाचे चुंबन घेते.
काय असतं करिअर प्लॅनिंग?
काही लोकांना प्रश्न पडतो की ‘करिअर प्लॅनिंग’ म्हणजे नेमकं काय? त्यामुळे त्यांच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे हे ठरवणे आणि ते ते पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन योजना करणे याला नियोज म्हणजेच ‘करिअर प्लॅनिंग’ म्हणतात. यासाठी तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्यांची यादी बनवाआणि त्यासाठी ठराविक वेळ द्या; नाहीतर तुमचा आयुष्यातील बराच वेळ फुकट जाईल.
यशस्वी लोकांचा सल्ला घ्या (Career Tips for College Students)
यशस्वी लोक करिअर नियोजनासाठी खूप मदत करु शकतात. अशा लोकांनी आपलं करिअर घडवताना कोणत्या गोष्टी अवलंबल्या आहेत; याची तुम्हाला मदत होवू शकते. आजच्या आधुनिक युगात करिअर प्लॅनिंग खूप महत्त्वाचे आहे, यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या नोकऱ्यांच्या असंख्य संधी मिळतात, ज्यासाठी तुम्हाला पद्धतशीर नियोजन करणे आवश्यक आहे.
डेली रुटीन पाळा
योग्य वेळी आणि योग्य वयात करिअरमध्ये यश (Career Tips for College Students) मिळवण्यासाठी, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण नियमित दिनचर्या पाळण्यास सुरुवात केली पाहिजे. जेणेकरून तुम्ही ती सर्व कामे न चुकता नियमितपणे करू शकाल.
इतरांच्या चुकांमधून शिका
आपण नेहमी म्हणतो की, ‘पुढच्यास ठेच आणि मागचा शहाणा.’ आपले मित्र मंडळ असो की घरातील वडीलधारी माणसे असो; आपल्याला नेहमीच इतरांच्या चुकांमधून शिकता येते. ज्या चुका थोरा मोठ्यांनी आपल्या आयुष्यात केल्या त्यापासून बोध घेवून अशा चुका पुन्हा आपल्या हातून होवू नयेत याची काळजी घेता आली पाहिजे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com