करिअरनामा ऑनलाईन । IPS अमृत जैन हे राजस्थानच्या भिलवाडा (Success Story) येथील रहिवासी आहेत. त्यांनी NIT वारंगलमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये B.Tech पूर्ण केलं आणि झेक टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून उच्च शिक्षण घेतलं. यानंतर त्यांना हैदराबादमधील एका खासगी कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. सर्व काही व्यवस्थित चालले असताना त्यांच्या मनात UPSC ची परीक्षा देण्याची इच्छा निर्माण झाली.
सलग 4 वेळा क्रॅक केली UPSC
परीक्षा पास होवून अधिकारी होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. अनेक उमेदवारांनी आपल्या मेहनतीने हे स्वप्न पूर्ण केलं आहे. यापैकीच एक आहेत IPS अमृत जैन. त्यांनी ही परीक्षा एक-दोनवेळा नाही; तर सलग चार वेळा पास केली आहे. सध्या ते उत्तर प्रदेश कॅडरचे IPS अधिकारी आहेत.
सामान्य कुटुंबातील अमृत (Success Story)
अमृत जैन अत्यंत सामान्य कुटुंबात जन्माला आले. 2016 मध्ये पहिल्यांदाच त्यांनी UPSC देण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी अभ्यासाची कोणतीही पूर्व तयारी न करता ही परीक्षा दिली. या परीक्षेविषयी बोलताना अमित सांगतात; “ही परीक्षा देताना माझ्यामध्ये अती आत्मविश्वासात होता. मला असं वाटायचं की यापरीक्षेत केवळ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे मी डोळेझाकून परीक्षा दिली; साहजिकच मला अपयशाचा सामना करावा लागला. यानंतर 2017 मध्ये मी पूर्ण मेहनत घेवून अभ्यास केला आणि परीक्षा दिली. मात्र यावेळी केवळ एक गुण कमी मिळाल्याने मला अपयश आले.”
कोचिंग क्लास शिवाय केला अभ्यास
अमृत यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की त्यांनी यूपीएससीच्या (UPSC) तयारीसाठी कोणताही कोचिंग क्लास लावला नाही. पूर्व परिक्षेत फक्त एका गुणाने नापास झाल्यास्थिर भागासाठी त्याने आपली रणनीती बदलली. त्यांनी स्टैटिक पोर्शनसाठी अनेक संदर्भ घेतले. याशिवाय त्यांनी 1 ते 1.5 तासांचा कालावधी निश्चित करुन 140 मॉक टेस्ट दिल्या.
मॉक टेस्ट देण्याचा दिला सल्ला
अमृत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना मॉक टेस्ट देण्याचा सल्ला देतात. त्यांना आलेल्या अनुभवाप्रमाणे परीक्षेदरम्यान मॉक टेस्ट दिल्या तर या सरावाचा परिक्षेत चांगला स्कोअर (Success Story) करण्यासाठी फायदा होतो. परीक्षेदरम्यान शांत आणि संयमित राहण्यासाठी मदत होते; परिणामी परीक्षेत चांगली कामगिरी करता येते; असं त्यांचं मत आहे. अमित यांनी यूपीएससी परीक्षेसाठी राज्यशास्त्र हा ऐच्छिक विषय ठेवला होता.
IAS होण्याचं स्वप्न अधूरे (Success Story)
अमृत जैन यांनी 2018, 2019, 2020 आणि 2021 मध्ये परीक्षेसाठी अर्ज भरला होता. 2018 मध्ये त्यांचे नाव राखीव यादीत होते. यानंतर त्यांची इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिसेसमध्ये निवड झाली. तर 2019 मध्ये त्यांना 321 वी रँक मिळाली. 2020 मध्ये 96 वी रँक आणि 2021 मध्ये 179 वी रँक मिळाली. ते चार वेळा यूपीएससी पास झाले पण ते IAS होवू शकले नाहीत. याबाबत अमित म्हणतात की, मी IAS होवू शकलो नाही याची मला खंत नाही. UPSC ची तयारी करणाऱ्या अनेकांचे स्वप्न IAS बनण्याचे असते, परंतु प्रत्येकजण हे स्वप्न करुच शकेल असं नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com