High Salary Jobs : CA ड्रॉप आउट केलंय?? काळजी नको.. तुमच्यासाठी आहेत ‘या’ लाखोंत पगार देणाऱ्या नोकऱ्या

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । चार्टर्ड अकाउंटंट होण्याचा प्रवास (High Salary Jobs) अत्यंत कठीण आहे; हे तुम्हा आम्हाला माहीतच आहे. CA हे पद प्रतिष्ठेचे पद मानले जाते. CA ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्ही Institute of Chartered Accountants in India (ICAI) चे सदस्य बनता. यानंतर तुमच्या नावासमोर CA पद लावता येते. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. पण बरेच लोक सीएचा अभ्यास मध्येच सोडतात. CA चा अभ्यास मध्येच सोडणं म्हणजे करिअरचा शेवट होणं; असं बोललं जातं. पण तसं अजिबात नाही. CA ड्रॉपआउट्ससाठी देखील अनेक करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत. हे पर्याय तुम्हाला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळवून देवू शकतात. या पर्यायाविषयी जाणून घेण्यासाठी पुढे वाचा…

1. डेटा विश्लेषक (Data Analyst)
आजच्या डेटा-चालित जगात, डेटा विश्लेषकांना मोठी मागणी आहे. डेटा विश्लेषणामध्ये स्वारस्य असलेल्या CA ड्रॉपआउट्ससाठी, डेटा विश्लेषणामध्ये करिअर सुरू करणे हा एक उत्तम पर्याय आहे. भारतातील डेटा विश्लेषकाचा सरासरी पगार वर्षाला 13 लाख रुपये आहे.
2. आर्थिक विश्लेषक (Economic Analyst)
वित्तीय विश्लेषकाचे काम डेटाचे विश्लेषण करून संस्थेच्या आर्थिक आरोग्याची तपासणी करणे आहे. याच्या आधारे व्यवसायाशी संबंधित योग्य निर्णय घेण्यास मदत केली जाईल. भारतातील आर्थिक विश्लेषकाचा सरासरी पगार वर्षाला 15 लाख रुपये आहे.

3. CA फर्म ऑडिटर (CA Firm Auditor)
तुमच्यासाठी ऑडिटर म्हणून करिअरचा उत्तम पर्याय आहे. प्रत्येक CA ला त्याच्या फर्मसाठी ऑडिटरची गरज असते. सीए ड्रॉपआउट ऑडिटर बनून लाखो रुपये कमवू शकतात. सीए फर्म ऑडिटरचा सरासरी पगार वर्षाला सुमारे 12 लाख रुपये असतो.
4. व्यवस्थापन सल्लागार (Management Consultant)
व्यवस्थापन सल्लागाराचे काम व्यवसाय संस्थेतील गुंतागुंतीच्या व्यावसायिक (High Salary Jobs) समस्यांचे निराकरण करण्यासाठी सल्ला देणे आहे. याशिवाय, कार्यक्षमतेत सुधारणा करून एकूण कामगिरीलाही चालना द्यावी लागेल. Glassdoor नुसार, भारतातील व्यवस्थापन सल्लागाराचा सरासरी पगार दरवर्षी 26 लाख रुपये आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com