10th and 12th Exam : 10 वी, 12 वीची परीक्षा एकदा द्यायची की दोनदा? निर्णय तुमचा… पहा काय म्हणाले केंद्रीय शिक्षण मंत्री

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । दहावी आणि बारावीच्या (10th and 12th Exam) विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. या इयत्तेच्या वर्षातून दोन वेळा बोर्डाच्या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देणं बंधनकारक नसेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगलं यश मिळवता यावं, त्यासाठी त्यांना अधिक वेळ मिळावा आणि अभ्यासाचा ताण कमी व्हावा यासाठी परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार अलीकडेच वर्षातून दोनवेळा बोर्डाची परीक्षा आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली होती. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ऑगस्टमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शालेय शिक्षणासाठी नवीन अभ्यासक्रम जारी केला होता.

यावेळी माहिती देताना शिक्षणमंत्री म्हणाले, “विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा जेईई सारखंच वर्षातून दोन वेळा 10वी, 12 वी च्या परीक्षेला बसण्याचा पर्याय असेल. यामध्ये (10th and 12th Exam) विद्यार्थी चांगले गुण मिळालेल्या परीक्षेचा पर्याय निवडू शकतात. मात्र, हे सर्व ऐच्छिक असून यावर कोणतंही बंधन नसणार आहे. कारण, विद्यार्थी आपलं वर्ष वाया गेलं, आपल्याला परिक्षेत आणखी चांगले गुण मिळवता आले असते या गोष्टीमुळे नेहमी तणावात असतात. त्यामुळे केवळ एका संधीच्या भीतीतून विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी वर्षातून दोन वेळा परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की तो परीक्षा देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि या परीक्षेतील प्रगतीवर खुश असेल तर त्या विद्यार्थ्यांने पुढची परीक्षा दिली नाही तरी चालेल;” असंही ते म्हणाले

ऑगस्टमध्ये शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार, वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. नवीन अभ्रासक्रम फ्रेमवर्क (NCF) च्या घोषणेनंतर आपण स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून ते या निर्णयावर आनंदी आहेत. त्यामुळे 2024 पासून सरकार वर्षातून दोन वेळा परीक्षा आयोजित करण्याच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
नवीन सत्रानुसार पाठ्यपुस्तके विकसित केली जाणार (10th and 12th Exam) आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 5+3+3+4 अभ्यासक्रम आणि शैक्षणिक संरचनेच्या आधारावर 4 राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क तयार केले आहेत. ज्याची National Education policy 2020 ने शालेय शिक्षणासाठी शिफारस केली आहे.

असे आहेत नवीन बदल – (10th and 12th Exam)
1. वर्षातून दोनवेळा बोर्डाच्या परीक्षा होतील.
2. ११, १२ वी च्या विद्यार्थ्यांना विषय निवडीची लवचिकता असेल.
3. कोणत्याही एका परीक्षेतील चांगले गुण निवडण्याचा पर्याय विद्यार्थ्यांकडे असेल.
4. २०२४ शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तके येतील.
5. पुस्तकांना कव्हर घालण्याचा प्रकार टाळला जाईल
6. पुस्तकांच्या किमतींवरही विचार केला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com