UPSC Exam Schedule 2024 : UPSC परीक्षेचे वेळापत्रक जारी, येथे जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC Exam Schedule 2024) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. UPSC अंतर्गत निवड होणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस प्रीलिम्स परीक्षा (UPSC CSE) २०२४ आणि आयएफएस (IFS) परीक्षा २६ मे २०२४ रोजी असेल. यूपीएससी परीक्षेसाठी तयारी करणारे विद्यार्थी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर upsc.gov.in परीक्षांची तारीख चेक करू शकतात.

या तारखेपर्यंत करा अर्ज
पदानुसार परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च असणार आहे. सिव्हिल (UPSC Exam Schedule 2024) सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा दि. २४ नोव्हेंबर २०२४ मध्ये असेल. यूपीएससीने (UPSC) परीक्षेसाठी १३ जानेवारी, २४ फेब्रुवारी, ९ मार्च, ६ जुलै, १० ऑगस्ट, १९ ऑक्टोबर, २१ नोव्हेंबर या तारखा राखीव ठेवल्या आहेत. एखादी परीक्षा रद्द झाल्यास या राखीव तारखांमध्ये परीक्षा घेतली जाईल.

पहा महत्वाच्या तारखा (UPSC Exam Schedule 2024)
इंडियन इंजीनियरिंग सर्व्हिसेस (पीटी) २०२४ परीक्षा १८ फेब्रुवारीला तर संयुक्त भू-वैज्ञानिक मुख्य परीक्षा १८ फेब्रुवारीला असेल.
यूपीएससी सीएसई प्रीलिम्स आणि एनडीए (NDA), सीडीएस (CDS) व्यतिरिक्त अन्य परीक्षांचे वेळापत्रकसुद्धा वेबसाइटवर जारी करण्यात आले आहे. इंजीनियरिंग सर्व्हिसेस साठीची पहिली परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी असेल. तर सीआयएसएफ एसी (EXE) एलडीसीई २०२४ चे आयोजन १० मार्च २०२४ ला आणि आयएएस, आयएफएस परीक्षा २१ जून २०२४ ला असेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com