Success Story : सरकारी नोकरीत असताना UPSC ची तयारी; ऑफिसच्या लंच ब्रेक मध्येही केला अभ्यास केला; आज आहे IAS अधिकारी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आपण पाहतो की दरवर्षी लाखो (Success Story) तरुण संपूर्ण भारतातून IAS होण्यासाठी जीवतोड मेहनत घेतात. अनेकजण अभ्यासासाठी गांव सोडून मोठ्या शहरात राहतात आणि फी भरुन कोचिंग क्लासला प्रवेश घेतात. पण काही तरुण असेही असतात जे केवळ सेल्फ स्टडी करुन ही परीक्षा पास होतात. असाच एक तरुण आहे प्रदीप सिंग; जो फक्त गुणवत्ता यादीत झळकला नाही; तर या परिक्षेत त्याने टॉप केले आहे. प्रदीपने 2019 मध्ये झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत संपूर्ण भारतातून पहिली रॅंक मिळवली आहे.

प्रदीप सिंग सोनीपतचे रहिवासी आहेत. प्रदीपचे वडील सुखबीर सिंग हे सोनीपतच्या गणौर ब्लॉकमधील तिवारी गावचे शेतकरी आणि माजी सरपंच आहेत. प्रदीपने सरकारी शाळेत 7वीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे जावून सोनीपतमधील एका खासगी शाळेतून 12वीचे शिक्षण घेतले. त्याने कोणताही कोचिंग क्लास न लावता सेल्फ स्टडी करुन UPSC परीक्षा पास केली आहे. आयएएस अधिकारी होण्यापूर्वी प्रदीप सिंह दिल्लीत आयकर विभागात इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते.

नोकरी सुरु असताना केली परीक्षेची तयारी (Success Story)
आपल्या प्रवासाविषयी प्रदीप सांगतात; “मी आयकर विभागात नोकरी करत होतो; पण तरीही मला IAS अधिकारी व्हायचं होतं. नोकरी करत असतानासुध्दा  अभ्यासक्रम पूर्ण  करण्यावर माझं लक्ष होतं. UPSCचा अभ्यास जिद्द आणि चिकाटीने करावा लागतो. अभ्यास करताना कधीकधी मला वाटायचे की मी अभ्यासाठी लायक नाही. मी खचून जायचो. पण या काळात माझ्या वडिलांनी मला नेहमी  प्रोत्साहन दिले; त्यामुळे मी UPSC पास होवू शकलो. यूपीएससी परीक्षेची तयारी करणे आणि त्याच वेळी नोकरी करणे; हे खरच खूप अवघड होते.”

तिसऱ्या प्रयत्नात झाले महसूल सेवेत अधिकारी
प्रदीप सिंह यांनी पदवीनंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) साठी प्रशिक्षण घेतले आणि पाच वर्षांपूर्वी दिल्लीत आयकर अधिकारी म्हणून त्यांना पहिली नोकरी (Success Story) मिळाली. परीक्षेच्या तिसर्‍या प्रयत्नात प्रदीप सिंगने 260 वी रँक मिळवली आणि ते फरिदाबादमध्ये भारतीय महसूल सेवेत अधिकारी बनले.

ऑफिसच्या लंच टाईममध्ये केला अभ्यास (Success Story)
एकाच वेळी आयएएसची तयारी आणि सरकारी नोकरी यामध्ये समतोल साधने प्रदीपसाठी खूप कठीण होते. नोकरीच्या काळात त्यांना जेव्हाही वेळ मिळायचा तेव्हा ते त्याचा अभ्यासाठी उपयोग करायचे. एकीकडे UPSC परीक्षेची तयारी सुरु असताना त्यांना महसूल विभागातील नोकरीची जबाबदारीही पूर्ण करायची होती. अभ्यासाला वेळ मिळावा यासाठी त्यांनी एक मिनिटही वाया जावू दिला नाही. गरज पडेल तिथे त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून अभ्यास केला. प्रवास करत असताना ते वेळ वाया घालवत नसत. प्रवासा दरम्यानही त्यांचा अभ्यास सुरुच असे. एवढंच नव्हे तर ऑफिसमधील लंच टाईममध्ये अभ्यास करण्यासाठी ते ऑफिसमधील काम लवकर संपवत असत.

तरुणांसाठी प्रदीप यांचा कानमंत्र
तरुण उमेदवारांचे मनोबल वाढवण्यासाठी ते यशाचा (Success Story) कानमंत्र देतात. ते म्हणतात; “UPSC ची तयारी करत असताना   अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे महत्त्वाचं आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक तयार करुन रोज ठरवलेला अभ्यास पूर्ण करता आला पाहिजे. मी अभ्यासाच्या तयारीसाठी यूट्यूबचीही मदत घेतली आणि ऑफिसला जाताना दररोज उपयुक्त व्हिडिओ पाहिले; या गोष्टी तुम्हीही करू शकता.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com