करिअरनामा ऑनलाईन । UPSC ची एक परीक्षा पास होणं हे (UPSC Success Story) किती कठीण आहे हे तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहिती आहे. 1 परीक्षा पास होता होता अनेकांच्या नाकी नऊ येतं. पण एक अवलिया असाही आहे ज्याने एकदा नव्हे तर तीन वेळा ही परीक्षा पास केली आहे. या बहद्दराने आपल्या आवडीचे पद मिळवण्यासाठी आधी 2 पदे सोडली आणि शेवटी मनासारखे पद मिळल्यानंतरच हा तरुण शांत बसला. कार्तिक जिवानी असं या तरुणाचं नांवआहे.
संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. लाखो मुले या परीक्षेला बसतात, पण भाग्यवान मोजकेच उमेदवार यामध्ये विजयी होतात. UPSC परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि नंतर मुलाखत; असे या परीक्षेचे टप्पे आहेत. या तिन्ही फेऱ्यानवर जो मात करतो तो यशस्वी होतो. कार्तिक जिवानीनेही असेच काहीसे केले आहे.
कार्तिकने तीनवेळा पास केली UPSC (UPSC Success Story)
आयुष्यात हार मानेची नाही असा कार्तिकचा दृढ निश्चय. UPSC ने घेतलेली परीक्षा त्याने एकदा नव्हे तर तीनदा पास केली आणि आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. गुजरातमधील सुरत येथील रहिवासी असलेल्या कार्तिकने विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्याने JEE मेन परीक्षेला बसून आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घेतला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच त्याने नागरी सेवा परीक्षा देण्याचे ठरवले आणि पहिला प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. पहिल्याच प्रयत्नानंतर चांगली तयारी करूनच सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेला बसणे योग्य ठरेल, हे त्याच्या लक्षात आले.
2017 मध्ये मिळाले पहिले यश
पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर कार्तिकने नागरी सेवा परीक्षेची जोरदार तयारी केली. कठोर परिश्रमानंतर, कार्तिकने 2017 मध्ये प्रथमच नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्यात यश मिळवले. यावेळी तो AIR 94 मिळवून उत्तीर्ण झाला होता. तो देशाच्या पोलिस दलात सर्वश्रेष्ठ IPS पदावर रुजू झाला. एवधीयवर तो समाधानी नव्हता. त्याने पुन्हा अभ्यासास सुरुवात केली. 2019 मध्ये तो पुन्हा एकदा परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि त्याने AIR 84 मिळवली होती.
IAS व्हायचं होतं
कार्तिकचे IAS अधिकारी होण्याचे स्वप्न होते आणि ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा त्याने रात्रंदिवस अभ्यास सुरु केला. दरम्यान त्याचे आयपीएस पदासाठी प्रशिक्षणही (UPSC Success Story) सुरु होते. अभ्यासासाठी 15 दिवसांची रजा घेऊन तो आपल्या घरी आला, जिथे त्याने सुट्टीच्या दिवसात दररोज 10 तास अभ्यास केला. 2020 मध्ये कार्तिक पुन्हा परीक्षेला बसला. कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे त्याने ही परीक्षाही उत्तीर्ण केली. संपूर्ण भारतातून 8 वी रॅंक मिळवत त्याने IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
कशी करायची UPSC परीक्षेची तयारी?
जर तुम्हीही कार्तिकप्रमाणे IAS होण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की यात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमासोबतच स्मार्ट वर्क करणे देखील खूप गरजेचे आहे. कार्तिकच्या मते, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये करिअर करण्यासाठी तुम्हाला काय (UPSC Success Story) अभ्यास करायचा आणि काय करू नये हे माहित असायला हवे. मेहनतीसोबतच तुम्ही स्वतः स्मार्ट असणंही खूप गरजेचं आहे.
परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर शिस्तबद्ध असणे खूप गरजेचे आहे. तो विद्यार्थ्यांना सल्ला देताना म्हणतो; “ज्या विषयावर तुमची पकड मजबूत आहे तो विषय आधी तयार करा, बाकीच्या विषयांची माहिती गोळा करा आणि आवडीने अभ्यास करा. जर तुम्हाला आयएएस परीक्षेची तयारी करायची असेल तर दररोज किमान 7 ते 9 तास अभ्यास करणे खूप गरजेचे आहे.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com