करिअरनामा ऑनलाईन । समाजात असे अनेक विद्यार्थी आहेत (Success Story) ज्यांना घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. अनेकांना अर्ध्या वाटेवर शिक्षण सोडावे लागते. मात्र या परिस्थितीवर मात करत अभ्यास करणारे मोजकेच असतात. त्यापैकी एक तरुण आहे कुलदीप द्विवेदी.
कुलदीप याने २०१५ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) घेतलेल्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत २४२ वा रँक मिळवून तो IRS अधिकारी बनला आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. लहान असल्यापासूनच गरीब आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या कुलदीपने आयुष्यात पुढे जाण्यासाठी अपार कष्ट सोसले पण जिद्द सोडली नाही.
वडिलांचा पगार फक्त 1,100 रुपये (Success Story)
IRS कुलदीप द्विवेदी हा उत्तर प्रदेशातील निगोह जिल्ह्यातील शेखपूर या छोट्याशा गावचा रहिवासी आहे. त्याचे वडील सूर्यकांत द्विवेदी लखनौ विद्यापीठात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. कुटुंबातील ते एकमेव कमावते सदस्य होते, त्यांचा महिन्याचा पगार फक्त ११०० रुपये होता. एवढ्याशा पगारात घर खर्च होत नव्हता. मुलांनाही शिकायचं होतं; यासाठी ते दिवसा शेतात काम करून नंतर नोकरी करायचे.
मोबाईल नसल्याने PCO वरुन करायचा फोन
कुलदीपला तीन भावंडे. यामध्ये कुलदीप अभ्यासात सर्वात हुशार मुलगा. त्याने २००९ मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. २०११ मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. अलाहाबादमध्ये राहून त्याने UPSC परीक्षेची तयारी केली होती. शिक्षणासाठी तो घरापासून लांब राहत होता. त्याच्याकडे मोबाईल नसल्याने तो पीसीओ फोनच्या माध्यमातून कुटुंबीयांशी बोलत असे.
उधारीच्या पुस्तकावर केला सेल्फ स्टडी
कुलदीप द्विवेदी २०१५ मध्ये UPSC परीक्षेत बसला. ही परीक्षा पास होणं हे त्याचं मुख्य उद्दिष्टय होतं. कुलदीपने यासाठी जीवतोड मेहनत घेतली. या मेहनतीचं फळ म्हणून तो परीक्षेच्या (Success Story) पहिल्याच प्रयत्नात पास झाला. संपूर्ण भारतातून २४२ व्या क्रमांक मिळवत तो IRS अधिकारी बनला आहे. विशेष म्हणजे कुलदीपने UPSC परीक्षेसाठी कोणत्याही महागड्या कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही तर त्याने इतर उमेदवारांकडून पुस्तके उधार घेऊन स्वयं अध्ययन केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com