Success Story : वय 30 वर्ष.. कर्ज 50 लाख; लेखणीनं बदललं आयुष्य; अन् झाली कर्जमुक्त 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनामिका जोशी मूळची केरळची आहे. तिचा (Success Story) जन्म एका छोट्या जिल्ह्यातील अलुपुरा गावी झाला. बारावीनंतर तीचे कुटुंब जयपूरला आले. याचे कारण तिच्या वडिलांच्या डोक्यावर असलेलं कर्ज हे होतं. हे कर्ज हळूहळू इतके वाढले की त्यांना स्थलांतरित व्हावे लागले. वडील कर्जात बुडाले होते. सावकार घरात येऊन धमक्या देत असत..वाईट बोलत असत अशा परिस्थितीत अनामिकाला लहानपणापासून कर्जाची भीती वाटत होती. योगायोगाने ती तिच्या पायावर उभी राहिल्यावर पुन्हा या कर्जाच्या भोवऱ्यात अडकली. मात्र, त्यावर मात करणारच, असा निर्धार तिने केला. अनामिकाने आपल्या लिखाणाच्या जोरावर परिस्थिती पुन्हा बदलली. वयाच्या 30 व्या वर्षी तीच्यावर 50 लाखांचे कर्ज होते.

स्वतःची जाहिरात एजन्सी सुरू केली
अनामिकाने दिल्लीच्या श्री अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर जवळपास 6 ते 7 महिने एका जाहिरात कंपनीत काम केले. वयाच्या २४ व्या वर्षी ती उद्योजक बनली. 2009 मध्ये अनामिकाने स्वतःची अॅड एजन्सी सुरू केली. यामध्ये तिचा पती तरुण हा बिझनेस पार्टनर होता. दोघांनी 2015 पर्यंत एकत्र बिझनेस चालवला. त्यानंतर दोघांनी मिळून ‘उत्पतांग’ नावाचे स्टार्टअप स्टोअर सुरू केले. यामध्ये त्यांनी चिन्ह, खुणा, पोस्टर इत्यादी गोष्टी बनवायला सुरुवात केली. दोन ते तीन वर्षे त्यांनी हा व्यवसाय केला. त्यानंतर दोघांनी संगीत आणि चित्रपट प्रॉडक्शन हाऊससाठी परवानाकृत माल तयार करण्याचे काम केले. ही संकल्पना परदेशात खूप लोकप्रिय आहे. त्यांच्या या कंपनीने प्रख्यात संगीतकार ए. आर. रहमान, जस्टिन बीबरसाठी काम केले आहे. कालांतराने अनामिका आणि तिचा नवरा कर्जात बुडाले. नेमकी हीच परिस्थिती तिने लहानपणी पाहिली होती.

वयाच्या ३० व्या वर्षी ५० लाखांचे कर्ज (Success Story)
वयाच्या 30 व्या वर्षी अनामिकावर 50 लाखांचे कर्ज होते. यामुळे ती खूप तणावाखाली राहू लागली. व्यवसायातील तोटा पाहून त्यांनी दिल्लीहून जयपूरला जाण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये ते भाड्याच्या घरात राहू लागले. हा तो काळ होता जेव्हा अनामिका तिचे बँक स्टेटमेंट बघून घाबरत असे. तिला पैशाची भीती वाटत होती.
स्वत: फ्रीलान्सिंग सुरू केले..नवऱ्याला नोकरी लागली
जयपूरला शिफ्ट झाल्यानंतर अनामिकाने फ्रीलान्सिंगला सुरुवात केली. दरम्यान, तिचे पती नोकरी करू लागले. 2019 मध्ये मदर्स डे निमित्त अनामिकाच्या एका मित्राने एक कार्यक्रम आयोजित केला होता. कॉपी रायटर असण्याशिवाय अनामिकाने एका जाहिरात एजन्सीमध्ये बराच काळ काम केले आहे, त्यामुळे तिला कविता कशा लिहायच्या हे माहित असले पाहिजे; असा विचार करून या मित्राने अनामिकाला कार्यक्रमात बोलावले. तोपर्यंत ती कविता लिहिते हे तिने कोणालाही सांगितले नव्हते.

आईवर लिहिलेल्या कवितेला मिळाली दाद
कवी संमेलनाविषयी ऐकल्यानंतर अनामिकाला प्रथम वाटले की आपण हे काम करू शकणार नाही. कार्यक्रमाच्या एक दिवस आधी तिची आई तीला भेटायला अचानक घरी आली. यावेळी (Success Story) तिच्या मनात आईने केलेल्या संघर्षाविषयी विचार आले. या विचारांना तिने कवितेचे रूप दिले. या कवितेचे शीर्षक होते ‘आई तू चुकू शकतेस’. तिच्या या कवितेचे खूप कौतुक झाले. मग हे कविता करणे अव्याहतपणे चालू राहिले.

लेखणीच्या वापरणे सर्व काही बदलले
अनामिकाचे ‘बत्तो की बकवास’ नावाचे इंस्टाग्राम पेजही आहे. पुन्हा (Success Story) लेखनात पाऊल टाकून अनामिका कर्जातून सावरली आहे. आज ती एक प्रसिद्ध ‘स्पोकन वर्ड आर्टिस्ट’ आहे. ‘स्पोकन वर्ड क्राफ्ट’ ही कवि संमेलनाची अपग्रेडेड आवृत्ती आहे. या अंतर्गत, व्यासपीठ उपलब्ध नसले तरी, ऑनलाइन माध्यमातून एखाद्याची निर्मिती लोकांना उपलब्ध करून दिली जाऊ शकते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com