UPSC Success Story : आईचं आजारपण..लग्नासाठी वाढता दबाव..तरीही खचली नाही..क्लास वन अधिकारी होवूनच दाखवलं

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येक UPSC उमेदवाराचे (UPSC Success Story) मसुरी येथील LBSNAA येथे प्रशिक्षण घेण्याचे स्वप्न असते. 2022 च्या UPSC परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झाले आणि सर्व प्रशिक्षणार्थी अधिकारी ९८व्या फाउंडेशन कोर्ससाठी LBSNAA ला पोहोचले आहेत. प्रियांका गोयल त्यापैकीच एक आहे. तिची यशोगाथा खूपच प्रेरणादायी आहे.

ज्यांना छोट्या-मोठ्या अपयशाची भीती वाटते त्यांच्यासाठी प्रियंका गोयलची कथा खूप प्रेरणा देणारी ठरू शकते. दिल्लीतील रहिवासी असलेल्या प्रियांकासाठी UPSC चा प्रवास खूप कठीण होता. मात्र या काळात ती हार न मानता आपल्या ध्येयावर ठाम राहिली. ती एक ध्येयवेडी मुलगी होती. तिच्यासाठी फक्त ध्येय गाठणं महत्वाचं होतं; मार्गात कितीही अडथळे आले तरी तिला त्याची पर्वा नव्हती.

ग्रॅज्युएशन नंतर सुरु केला UPSC चा अभ्यास (UPSC Success Story)
प्रियांका गोयल ही दिल्लीची रहिवासी आहे. पीतमपुरा येथील महाराजा अग्रसेन मॉडेल स्कूलमधून तिने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. यानंतर तिने केशव महाविद्यालय, दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने सरकारी नोकरीसाठी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.

6 वेळा दिली परीक्षा
प्रियांका गोयलने UPSC परीक्षा देण्यासाठी एकूण 6 वेळा परीक्षा दिली. जर ती UPSC CSE मध्ये नापास झाली असती तर तिचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे राहिले असते. प्रियांका गोयलने परीक्षेसाठी पर्यायी विषय लोक प्रशासन ठेवला होता. यामध्ये तिला 292 गुण मिळाले होते. प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितले की; तिचा यूपीएससी परीक्षेचा प्रवास खूप कठीण होता. ती कधी यशस्वी होईल की नाही हे देखील तिला माहित नव्हते.

अनेकवेळा आलं अपयश
UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात प्रियंका गोयलला अभ्यासाचा आवाका लक्षात आला नव्हता. यामध्ये ती पूर्व परीक्षा पास करू शकली नव्हती. दुसऱ्या प्रयत्नात तिचे ०.७ गुणांनी कट (UPSC Success Story) ऑफ लिस्टमधील स्थान हुकले. ती तिसर्‍या प्रयत्नात यूपीएससी मुख्य परीक्षेत नापास झाली. चौथ्यावर्षी ती CSAT मध्ये मागे राहिली. पाचव्या वर्षी, कोविड काळात तिच्या  आईचे 80% फुफ्फुस खराब झाले होते. यावेळीही ती प्रिलिम्स क्लिअर करू शकली नाही.

अखेर अधिकारी झालीच
प्रियांका पाचव्यावेळी परीक्षा देत होती तेव्हा ती एका संकटातून जात होती आणि अशा परिस्थितीत स्पर्धा परीक्षा पास करणे खरोखरच अवघड होते. घरातून तिच्यावर लग्नासाठी दबाव (UPSC Success Story) वाढू लागला होता. आता तिच्याकडे फक्त एकच संधी होती; त्यामुळे तिला आपली क्षमता सिद्ध करायची होती. शेवटी तिच्या मेहनतीला फळ मिळाले आणि 2022 च्या UPSC परीक्षेत तिने 965 गुण मिळवत संपूर्ण भारतात (AIR) 369 वा क्रमांक मिळवला आणि ती भारताची नागरी सेवक (Civil Servant) बनली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com