करिअरनामा ऑनलाईन । घरातील मुले शिकून मोठी होऊन (UPSC Success Story) अधिकारी होतात, तेव्हा घरातील सदस्यांना वेगळा आनंद मिळतो आणि मुलांनाही वेगळाच आनंद मिळतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिला IAS अंकिता चौधरीची गोष्ट सांगणार आहोत जी IAS ऑफिसर झाली पण तिच्या आनंदात तिची आई तिच्यासोबत नव्हती. ती फक्त आठवणीत होती.
IIT दिल्लीतून केलं पोस्ट ग्रॅज्युएशन
अंकिताच्या आयएएस होण्यापूर्वीच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, अंकिताने तिचे सुरुवातीचे शिक्षण इंडस पब्लिक स्कूल, रोहतकमधून केले. तेथून 12 वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिने दिल्लीतील हिंदू कॉलेजमधून रसायनशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदवीचे शिक्षण घेत असतानाच तिने IAS होण्याचे ठरवले होते आणि त्यानुसार अभ्यास सुरू केला होता. मात्र पदव्युत्तर पदवी पूर्ण होईपर्यंत तिने अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित केले. अंकिताने IIT दिल्लीतून पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. यानंतर ती पूर्णपणे IASच्या तयारीत गुंतली होती.
अचानक झाला आईचा अपघाती मृत्यू (UPSC Success Story)
हाती आलेल्या माहितीनुसार अंकिता जेव्हा UPSCची तयारी करत होती, तेव्हा तिच्या आईला एका अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. अंकिताला याचा मोठा धक्का बसला. त्यावेळी अंकिताच्या वडिलांनी तिला पूर्ण साथ दिली आणि प्रोत्साहन दिले. अंकिताने पहिल्यांदा परीक्षा दिली तेव्हा ती परीक्षा पास होवू शकली नाही.
संपूर्ण भारतातून मिळवली 14 वी रॅंक
अंकिताने पहिल्यांदा झालेल्या चुका सुधारून दुसऱ्यावेळी दुप्पट अभ्यास केला. तिने अभ्यासाची रणनीती बदलली आणि पुन्हा परीक्षा दिली. या यशाचे फलित म्हणून 2018 च्या परीक्षेत (UPSC Success Story) अंकिताला संपूर्ण भारतातून 14 वा रॅंक मिळाला होता. “तुम्ही तुमची तयारी प्रामाणिकपणे करा, योग्य रणनीती महत्त्वाची भूमिका बजावते;” असेही अंकिता सांगते. अंकिताचा ऐच्छिक विषय होता लोक प्रशासन. अंकिता चौधरीचे वडील सत्यवान हे साखर कारखान्यात अकाउंटंट आहेत.
सामान्य कुटुंबातील अंकिता
IAS अंकिता चौधरीचे कुटुंब अत्यंत साधे आणि मध्यमवर्गीय आहे. अंकिताचे वडील साखर कारखान्यात अकाउंटंट आहेत तर तिची आई गृहिणी होती. अंकिता लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिला स्वतंत्र आणि स्वावलंबी राहायला आवडायचं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com