Business Success Story : मेहनतीनं उभं केलं हजारो कोटींचं साम्राज्य अन् झाल्या फोर्ब्सच्या यादितील श्रीमंत महिला!! पहा कोण आहेत लिना तिवारी?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आज आपण पाहतो की (Business Success Story) कोणत्याही क्षेत्रात महिला पुरुषांच्या मागे नाहीत. देशातील महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. मग ते क्षेत्र कोणतंही असो. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचे वर्चस्व असल्याचं पहायला मिळत आहे. व्यावसायिक क्षेत्रातही महिला उत्तुंग कामगिरी करीत आहेत. अनेक महिलांनी व्यवसायाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची संपत्ती कमावली आहे. आज आपण अशाच एका यशस्वी महिलेबद्दल बोलणार आहोत, जिने आपल्या मेहनतीच्या जोरावर हजारो कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले आहे. आज त्यांच्या हाताखाली शेकडो लोक काम करतात.

ही अब्जाधीश महिला आहे लीना तिवारी. आज लीना तिवारी यांची गणना देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत महिला म्हणून केली जाते. पण असे असूनही फार कमी लोकांना त्यांच्याबद्दल माहिती आहे; कारण त्या नेहमीच प्रसिध्दी झोतापासून दूर राहतात. सध्या लीना तिवारी या फार्मा कंपनी ‘यूएसव्ही इंडिया’च्या अध्यक्षा आहेत.

श्रीमंतांच्या यादीत 51 वा क्रमांक (Business Success Story)
फोर्ब्सने यंदा एप्रिल महिन्यात भारतातील सर्वात श्रीमंत महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीत फोर्ब्सने लीना तिवारींना 5व्या स्थानावर ठेवले होते. ‘यूएसव्ही इंडिया’ या फार्मा कंपनीचा पाया त्यांचे दिवंगत वडील विठ्ठल तिवारी यांनी 1961 साली घातला होता. या कामात रेव्हलॉनने वडिलांना साथ दिली होती. सध्या लीना तिवारी 65 वर्षांच्या आहेत. साल 2022 मध्ये फोर्ब्सने लीना तिवारींना भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 51 व्या स्थानावर ठेवले होते.

२८,००० कोटींहून अधिक एकूण संपत्ती
लीना तिवारी यांची कंपनी USV फार्मा इंजेक्टेबल्स, फार्मास्युटिकल घटक आणि बायोसिमिलर औषधे बनवते. ही कंपनी मधुमेहावरील औषधे बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीचे नाव (Business Success Story) मधुमेहावरील औषध बनवणाऱ्या देशातील पहिल्या तीन कंपन्यांमध्ये घेतल्याचे सांगितले जाते. सध्या लीना तिवारी यांची अंदाजे NetWorth 3.5 billion dollar म्हणजेच 28,000 कोटींपेक्षा जास्त आहे.

पती प्रशांत तिवारी USV चे व्यवस्थापकीय संचालक
२०२१ मध्ये लीना तिवारी यांनी आरोग्य सेवा क्षेत्रासाठी 24 कोटी रुपयांची देणगी दिली. याशिवाय इतर क्षेत्रातही त्या वेळोवेळी करोडो रुपयांची देणगी देत असतात. लीना तिवारी (Business Success Story) यांच्या पतीचे नाव प्रशांत तिवारी आहे. प्रशांत तिवारी सध्या USV चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. विशेष म्हणजे प्रशांत तिवारी हे देखील IITian आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. दोघांनाही एक मुलगी असून, तिचे नाव अनिशा गांधी तिवारी आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com