करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वीच ठाण्याच्या (Aarogya Vibhag Bharti 2023) सरकारी रुग्णालयात अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर विरोधकांनी आरोग्य यंत्रणेवर आणि आरोग्य विभागात करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेविषयी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. त्यामुळे आता सरकारने याबाबत ठोस पावले उचलत आरोग्य विभागात 12 हजार पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडयात 11,903 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. ही जाहिरात आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या पदांसाठी असणार आहे.
‘ही’ पदे भरली जाणार? (Aarogya Vibhag Bharti 2023)
हाती आलेल्या माहितीनुसार, पुढील आठवडयात ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 11,903 जागांसाठी जाहिरात निघेल. मुख्य म्हणजे, ही भरती प्रक्रिया MPSC, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. तसेच 11,903 जागांमध्ये गट ‘क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या रिक्त जागांचा (Aarogya Vibhag Bharti 2023) समावेश असेल. तर गट ‘ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्ष सेवक या पदांसाठी भरती करण्यात येईल. पुढील आठवड्यात या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर इतर अधिक माहिती समजेल.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेचा प्रश्न खोळंबलेला होता. त्यामुळे इतर उमेदवार देखील या भरती प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच ठाण्यातील रुग्णालयात एकाच वेळी 18 जणांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली. त्यानंतरच सरकारने तातडीने आरोग्य विभागात रिक्त जागा भरण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयात कर्मचारी नसल्यामुळे सर्व भार अधिकाऱ्यांवर पडत आहेत. यामुळे रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. या कारणानेच आरोग्य विभागात 11,903 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com