Talathi Bharti : तलाठी भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार? पहा यादी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी (Talathi Bharti) प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या महसूल  विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीवरुन आपली स्पर्धा किती जणांबरोबर आहे याची माहिती मिळते. आज आपण  तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले? या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत…

‘इतके’ अर्ज प्राप्त झाले (Talathi Bharti)
संपूर्ण राज्यभरात 4644 पदांसाठी तलाठी भरती होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तलाठी भरतीसाठी एकूण 10,41,713 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यासाठी 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत दररोज 50 ते 60 हजार उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार असून राज्यभरात ही परीक्षा एकूण 20 दिवस चालणार आहे.
तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले याबद्दल माहिती मिळवणे फार आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या जिल्ह्यात किती स्पर्धा किती आहे. आपणास अभ्यासाची तयारी कशापद्धतीने करावी लागणार याबाबत अंदाज बांधता येवू शकतो. प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या जाणून घेतल्यामुळे उमेदवारांना परीक्षेशी संबंधित तयारीचे नियोजन आणि धोरण तयार करण्यास मदत होते.

पहा कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार
Talathi Bharti

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com