करिअरनामा ऑनलाईन । दरवर्षी हजारो विद्यार्थी UPSC ची (UPSC Success Story) परीक्षा देत असतात. काहीजण एक दोन प्रयत्नांमध्ये उत्तीर्ण होतात तर काहींना अनेकवेळा प्रयत्न करावा लागतो. UPSC ची परीक्षा देशातील कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेचा अभ्यास म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक दिव्यच. या कठीण काळात उमेदवारांना परिवाराचा भक्कम आधार असणं त्यांना बळ देतं. मात्र ही गोष्ट अशा एका विद्यार्थिनीची आहे जिने परिवाराच्या विरोधाला न जुमानता आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. ही गोष्ट आहे तिच्या जिद्दीची व परिश्रमांची.
स्त्री शिक्षणाला घरातूनच होता विरोध
IAS वंदना सिंग चौहान यांचा जन्म हरियाणातील एका छोट्याशा गावात झाला. वंदनाच्या घरचं वातावरण महिला शिक्षणाला प्रोत्साहन देणारं मुळीच नव्हतं. उत्तम शिक्षण घेता यावं म्हणून त्यांचे वडील महिपाल सिंग चौहान यांनी वंदना यांचा प्रवेश मुरादाबाद येथील कन्या गुरुकुल मध्ये घेतला. त्यांच्या (UPSC Success Story) या निर्णयाला आजोबा, काका व इतर परिवारातील सदस्यांनी नेहमीच विरोध केला. तरीही आपल्या वडिलांच्या मदतीने वंदना यांनी शिक्षण सुरुच ठेवलं. त्यांनी आग्रा येथे बी. आर. आंबेडकर विद्यापीठात एल. एल. बी. ची पदवी मिळवण्यासाठी प्रवेश घेतला तरीही घरुन विरोध होतच होता; यामुळे कॉलेजला जाऊन अभ्यास करणं त्यांना शक्य नव्हतं. यावर पर्याय म्हणून वंदना यांनी ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करत वकिलीची पदवी मिळवली.
12 ते 14 तास अभ्यास (UPSC Success Story)
वकिलीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी UPSCची तयारी सुरू केली. मात्र वेळोवेळी त्यांना घरच्यांच्या विरोधाला तोंड द्यावं लागायचं. दिवसातील १२ ते १४ तास त्या अभ्यास करण्यात घालवत असत. या कठीण काळात त्यांच्या भावाने जमेल ती सगळी मदत त्यांना करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. हा खडतर प्रवास सुरु असताना 2012 मध्ये संपूर्ण भारतातून 8 वी रॅंक मिळवत त्या IAS अधिकारी झाल्या. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ही खडतर परीक्षा पार केली होती.
सध्या त्या उत्तराखंडच्या अलमोरा जिल्ह्यात डिस्ट्रिक्ट मॅनेजर म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांचं हे कर्तृत्व अनेक मुलींसाठी प्रेरणा ठरत आहेत. त्यांच्यातील जिद्द आणि (UPSC Success Story) चिकाटी आजही अनेकांना अडथळ्यांची पर्वा न करता परिश्रम करण्याची ताकद देते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com