UPSC Succeess Story : गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून सुरु केला अभ्यास; 6 वी रॅंक मिळवून बनली IAS अधिकारी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । विशाखा यादवच्या यशाची गाथा (UPSC Succeess Story) तिच्या दृढ निश्चयाचा आणि समर्पणाचा पुरावा आहे. एक चांगली नोकरी सोडण्यापासून ते UPSC परीक्षेत संपूर्ण भारतात 6 वी रँक मिळवण्यापर्यंतचा तिचा प्रवास चिकाटी आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याच्या सामर्थ्याचे जीवंत उदाहरण देतो. अनोळखी वाटेवर चालण्याचं केलेलं धाडस आणि  संकटांवर मात करत यशापर्यंत पोहचण्याचा तिचा प्रवास देशातील तरुण उमेदवारांसाठी प्रेरणा देणारा आहे.

UPSC Succeess Story of Vishakha Yadav IAS

 

सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची घेतली डिग्री
1994 मध्ये दिल्लीच्या द्वारका येथे विशाखाचा जन्म झाला. ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर तिने 2014 मध्ये दिल्ली टेक्नॉलॉजिकल (UPSC Succeess Story) युनिव्हर्सिटीमधून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. या शिक्षणानंतर, तिने सिस्को सिस्टम्स, बंगलोर येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून यशस्वीपणे नोकरी करण्यास सुरवात केली. या नोकरीत तिचं मन रमत नव्हतं. काहीतरी वेगळं करण्याच्या तळमळीने तिला तिची सुरक्षित नोकरी सोडून IAS अधिकारी होण्याच्या मार्गावर जाण्यास प्रवृत्त केले.

UPSC Succeess Story of Vishakha Yadav IAS

 

कुटुंबाचा मजबूत पाठिंबा
विशाखाची IAS होण्याची इच्छा तिच्या कुटुंबाने मजबूत केली होती. तिचे वडील राजकुमार यादव हे सहाय्यक उपनिरीक्षक आहेत तर तिची आई सरिता यादव या गृहिणी आहेत. या जोडीने विशाखाच्या आकांक्षा जोपासत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला. तिला तिच्या आई-वडिलांकडून मिळालेले अतूट प्रोत्साहन तिच्या या खडतर प्रवासात आधारस्तंभ ठरले.

UPSC Succeess Story of Vishakha Yadav IAS

हा निर्णय ठरला टर्निंग पॉइंट (UPSC Succeess Story)
2017 मध्ये, विशाखाने तिची गलेलठ्ठ पगाराची आरामदायी नोकरी सोडून UPSC परीक्षेची तयारी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. हा निर्णय तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. UPSC परीक्षा क्रॅक करायचीच या निश्चयाने तिने अभ्यासासाठी स्वतःला वचनबद्ध केले. अभ्यासात अडथळा येवू नये यासाठी तिने सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवले आणि पूर्णपणे तिच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले. यासाठी शहरातील लायब्ररीमध्ये तिने तासनतास अभ्यास केला.

UPSC Succeess Story of Vishakha Yadav IAS

संपूर्ण भारतात मिळवला 6 वा क्रमांक 
विशाखाचा प्रवास सोपा नव्हता. यावेळी तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. UPSC ची परीक्षा देताना पूर्व परिक्षेत तिला दोनवेळा अपयश आले. तिसर्‍या प्रयत्नात मात्र तिला यश मिळाले, कारण तिने केवळ UPSC परीक्षा उत्तीर्णच केली नाही तर संपूर्ण भारतात 6 वा क्रमांक मिळवला होता.

UPSC Succeess Story of Vishakha Yadav IAS

 

तरुणांसाठी संदेश
आपली सुरक्षित कारकीर्द सुरु असताना ती मध्येच सोडून UPSC परीक्षेत उल्लेखनीय रँक मिळवण्यापर्यंतचा विशाखाचा  प्रवास अधोरेखीत करण्यासारखा आहे. तिची (UPSC Succeess Story) कहाणी देशातील असंख्य इच्छुकांसाठी आशेचा किरण बनली आहे. ‘कठोर परिश्रम, समर्पण आणि अथक प्रयत्नाने कोणतेही ध्येय गाठता येते;’ हा संदेश ती देशातील तरुण पिढीला देते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com