करिअरनामा ऑनलाईन । देशात सर्वात अवघड (UPSC Success Story) मानली जाणारी परीक्षा म्हणजे UPSC. देशातील अनेक विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत घेत असतात. ही परीक्षा पार करणारी लोकं आज देशातील तरुणांसाठी आदर्श बनले आहेत. आजची कहाणी देखील अशाच एका IPS ऑफिसरची आहे. त्या किरण बेदी (Kiran Bedi) यांना आपला आदर्श मानतात. आजही त्यांच्या नावामुळे नक्षलवाद्यांचा थरकाप उडतो. ही गोष्ट आहे दबंग लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या IPS अधिकारी अंकिता शर्मा (Ankita Sharma) यांची… तर कोण आहेत अंकिता शर्मा हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा….
छत्तीसगडच्या आहेत अंकिता शर्मा
IPS (IPS) अंकिता शर्मा यांचा जन्म 25 जून 1990 रोजी छत्तीसगडमध्ये झाला. त्यांचे वडील राकेश शर्मा हे व्यापारी होते तर त्यांची आई गृहिणी आहे. आपल्या दोन बहिणींमध्ये अंकिता या सर्वात मोठ्या आहेत. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असलेल्या अंकिता यांनी सरकारी शाळेतून आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. पदवी (Graduation) पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी MBA (MBA) पूर्ण केले. यानंतर UPSC कडे त्यांनी आपला मोर्चा वळवला.
नुसत्या नावाने नक्षलवाद्यांचा उडतो थरकाप (UPSC Success Story)
अंकिता यांनी पूर्ण ताकदीने UPSC (UPSC) च्या अभ्यासाला सुरवात केली. केवळ तिसऱ्याच प्रयत्नात त्यांना UPSC मध्ये यश मिळालं आहे. या परिक्षेत त्यांना संपूर्ण भारतातून 203 वी रॅंक मिळाली आहे. 2018 बॅचच्या अंकिता या छत्तीसगड कैडरच्या IPS अधिकारी आहेत. वर्ष 2022 पासून त्या खैरगड येथे SP म्हणून कार्यरत आहेत. या आधीच त्यांनी आपल्या धडक कारवाईतून नक्षलवाद्यांवर असा काही दरारा बसवला की आजही देशाच्या कानाकोपऱ्यातील नक्षलवादी केवळ त्यांच्या नावाने घाबरतो.
कोण आहेत अंकिता शर्मा यांच्या आदर्श?
अंकिता असं म्हणतात की त्यांना लहानपणीपासूनच किरण बेदींसारखं बनायचं होतं. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणतात की UPSC बद्दल त्यांना काहीच माहिती (UPSC Success Story) नव्हती व यामुळेच त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. मात्र किरण बेदी यांच्याकडून प्रेरणा घेत त्या आयपीएस अधिकारी बनल्या. अंकिता यांचे पती विवेकानंद भारतीय सेनेत मेजर म्हणून कार्यरत आहेत; ते आपली पत्नी अंकिता यांना कामात नेहमीच मोलाची साथ देत असतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com