Success Story : UPSC साठी सोडली फिल्मी दुनिया, आधी PCS नंतर IAS अधिकारी बनून करतेय देशसेवा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । चित्रपटांमध्ये, अनेक अभिनेते आणि अभिनेत्री (Success Story) आपल्याला पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसतात. परंतु वास्तविक जीवनात अभिनेत्री किंवा अभिनेत्याने IAS झाल्याची कथा क्वचितच कोणी तरी ऐकली असेल. मात्र एका बालकलाकाराने आपले चित्रपट जग सोडून आपला सगळा वेळ UPSCच्या तयारीत घालवला आहे हे खरे आहे. UPSCची तयारी करण्यासाठी या बाल कलाकाराने अभिनय क्षेत्राला बाय बाय करत अभ्यासाकडे आपला मोर्चा वळवला. प्रामाणिक प्रयत्न करुन परीक्षाही पास केली. एच. एस. कीर्तनाने हे यश कसं मिळवलं यासाठी पुढे वाचा…

UPSC साठी टेलिव्हिजनचे जग सोडले (Success Story)
अनेक चित्रपट आणि टीव्ही शो केलेल्या बालकलाकार एच. एस. कीर्तनाने (HS Kirtana) टीव्हीचे चकाचक जग सोडून UPSCच्या तयारीसाठी आपला वेळ दिला. सलग पाचवेळा अपयश आल्यानंतरही हार न मानता कीर्तनाने सहाव्या प्रयत्नात UPSCची परीक्षा पास केली. याच जिद्दीमुळे ती आज IAS अधिकारी आहे.

अभिनेत्री बनली IAS अधिकारी
अभिनेत्री एच. एस. कीर्तनाने सहाव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांची पहिली पोस्टिंग कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त म्हणून झाली होती. कीर्तनाने (Success Story) गंगा-यमुना, सर्कल इन्स्पेक्टर, लेडी कमिशनर, मुदिना आलिया, उपेंद्र, ए हब्बा, दोरे, ओ मल्लीगे, जननी, पुतानी आणि चिगुरु जे यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

पटकावली 167 वी रॅंक
या अभिनेत्रीने 2011 मध्ये पहिल्यांदाच कर्नाटक प्रशासकीय सेवा परीक्षेत हजेरी लावली होती. येथे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने दोन वर्षे KAS अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर तिने UPSC परीक्षेची तयारी सुरू केली आणि 2013 मध्ये पहिल्यांदा UPSC CSE परीक्षेला बसली. मात्र, पाच प्रयत्नांनंतर तिला 2020 मध्ये UPSCमध्ये यश मिळवले आहे. संपूर्ण भारतातून (AIR Rank) 167 वी रँक मिळवून ती IAS अधिकारी बनली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com