Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीच्या अर्जासाठी मुदत वाढली; आज रात्री 11:55 पर्यंत करता येणार अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यात तलाठी पदभरतीसाठी (Talathi Bharti 2023) अर्ज प्रक्रिया सुरु असताना महाराष्ट्र शासनाची महसूल विभागाची वेबसाईट सोमवारी दिवसभर बंद राहिल्याने उमेदवारांना अर्ज भरता आला नाही. याबाबत झालेला गोंधळ समोर आल्यानंतर सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता महसूल व वनविभागातर्फे भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक आनंद रायते यांनी शुद्धीपत्रक काढून एका दिवसाची मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत तलाठी (गट क) संवर्गातील एकूण 4644 पदांसाठी अर्ज करण्यासाठी सोमवार दि. 17 जुलै हा शेवटचा दिवस होता. उमेदवार अर्ज (Talathi Bharti 2023) करण्याच्या गडबडीत असताना सकाळी 11 वाजल्यापासूनच अधिकृत वेबसाईट बंद होती. अनेक उमेदवारांना अर्ज भरण्यात अडचण येत असल्याची माहिती मिळताच सोमवारी संध्याकाळी ई-महाभूमी (महसूल व वनविभाग) अतिरिक्त संचालक आनंद रायते यांनी यासंदर्भात मुदत वाढीबाबत शुद्धीपत्रक काढले.
त्यानुसार आता  दि. 18 जुलै 2023 रोजी रात्री  11:55 वाजेपर्यंत तलाठी भरतीच्या रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. तर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी दि. 20 जुलै रात्री 11:55 वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com