करिअरनामा ऑनलाईन । कॉफी म्हटलं की ‘कॅफे कॉफी डे’ची आठवण (Business Success Story) झाल्याशिवाय राहत नाही. तुमच्यापैकी अनेकांनी CCD रेस्टॉरंटला नक्कीच भेट दिली असेल. हे असे रेस्टॉरंट आहे जिथे क्लासिक कॅपिचिनो, फिल्टर कॉफी आणि आय-ओपनर एक्सस्प्रेसो यासारख्या लज्जतदार कॉफीचा आस्वाद तुम्ही घेता. देशातील वाढती कॉफी संस्कृती पाहून 1996 मध्ये कर्नाटकचे रहिवासी व्ही. जी. सिद्धार्थ यांनी ‘CCD’ ची स्थापना केली. कॉफी स्टोअरच्या या चेनने देशात चांगली कामगिरी केली. व्यवसाय अगदी तेजीत सुरु होता पण नंतर कंपनीला अनेक चढउतार पहावे लागले. दरम्यान कंपनी कर्जात बुडाली आणि मग आणखी एक वाईट बातमी येवून धडकली.
CCD एक परिपूर्ण कंपनी दिसत होती पण त्याच्या व्यवस्थापनात बऱ्याच समस्या होत्या. CCD ब्रँड हजारो कोटींच्या कर्जात बुडाला आणि मग व्ही. जी. सिद्धार्थ यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. मंगळूरजवळील नेत्रावती नदीत उडी मारुन त्यांनी आपले आयुष्य संपवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार CCD वर एकूण 7 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते.
पत्नीने हाती घेतली सूत्रे (Business Success Story)
कंपनी कर्जात बुडाली होती . सिद्धार्थच्या निधनानंतर कंपनी बंद होईल; असं सर्वांना वाटत असताना सिद्धार्थची पत्नी मालविका हेगडे यांनी कंपनीची सूत्रे हाती घेत CCD चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार सांभाळला. मालविका हेगडे ही कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांची मुलगी आहे. मालविका यांचा जन्म 1969 मध्ये बेंगळुरू येथे झाला. 1991 मध्ये सिद्धार्थ यांच्याशी त्यांचे लग्न झालं.
पतीचे निधन आणि कर्जाचा डोंगर
सिद्धार्थ जेव्हा कॉफीचा व्यवसाय सुरू करत होते तेव्हा तो फार काळ चालणार नाही, असं सगळे बोलत होते. परंतु CCD सुरु झाले आणि दोन दशकात कंपनी देशातील सर्वात मोठा कॉफी ब्रँड म्हणून नावारुपास आली. मात्र, काही त्रुटींमुळे कंपनीची पडझड सुरु झाली आणि कंपनी मोठ्या (Business Success Story) कर्जात बुडाली. यादरम्यान 2019 मध्ये व्ही. जी. सिद्धार्थच्या आत्महत्येचे वृत्त समोर आले. 6 तासांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह नदीपात्रात सापडला. त्यानंतर प्रतिकूल आणि अत्यंत वाईट परिस्थितीत मालविका हेगडे यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली. त्यांची मेहनत फळाला आली आणि दोन वर्षातच कंपनी पुन्हा आपल्या पायावर उभी राहिली.
मालविकाने जिद्द सोडली नाही
पती सिद्धार्थच्या निधनाने मालविकाला मोठा धक्का बसला होता कारण तिचे आनंदी घर उध्वस्त झाले होते. पतीच्या मृत्यूचा धक्का… करोडोंच्या कर्जात बुडालेली कंपनी… स्वतःला आणि व्यवसायाला सांभाळणे… सर्वच कठीण होवून बसले होते. पण CCD ला पुन्हा उभे करण्याच्या जिद्दीने मालविकाने न डगमगता पुढे पावले टाकण्यास सुरवात केली.
CCD ब्रँड पुन्हा उदयास आला
31 मार्च 2019 च्या आकडेवारीनुसार CCD वर सुमारे 7 हजार कोटींचे कर्ज होते, पण मालविका यांनी हिम्मत सोडली नाही. त्यांनी न डगमगता ब्रँडला पुन्हा सोनेरी दिवस आणले. CCDला यशस्वी बिझनेस मॉडेल बनवण्याचे पतीचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली (Business Success Story) आणि व्यवसायात कमाल करण्यास सुरूवात केली. त्यांनी CCD मध्ये काम करणार्या हजारो कर्मचार्यांच्या जबाबदाऱ्या आणि परिस्थितीही चांगल्या प्रकारे समजून घेतल्या. डिसेंबर 2020 मध्ये मालविका हेगडे कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडच्या CEO बनल्या आणि बिकट आर्थिक परिस्थितीशी लढा देत त्यांनी अल्पावधीतच कंपनी पुन्हा उदयास आणली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com