UPSC Success Story : विना कोचिंग केवळ सेल्फ स्टडी; रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करणारा अंशुमन झाला IAS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तुमच्यामध्ये असणारी जिद्द कोणत्याही (UPSC Success Story) वाईट परिस्थितीत तुमच्या ध्येयाच्या मार्गात अडथळा आणू शकत नाही. आज आपण अशाच एका जिद्दी व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने कोणतेही कोचिंग क्लास न लावता सेल्फ स्टडी करुन मेहनतीच्या जोरावर देशातील सर्वात कठीण UPSC परीक्षा पास केली आहे.

UPSC Success Story of IAS Anshuman Raj

रॉकेलच्या दिव्याखाली केला अभ्यास
IAS अधिकारी अंशुमन राज हे बक्सर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहायचे. गावातील नवोदय विद्यालयातून त्यांनी 10 वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे रॉकेलच्या (UPSC Success Story) दिव्याखाली बसून त्यांनी दहावीपर्यंतचा अभ्यास केला आहे. यानंतर त्यांना बारावीच्या अभ्यासासाठी JNV रांची येथे जावे लागले.

UPSC Success Story of IAS Anshuman Raj

सामान्य कुटुंबात जन्माला आले अंशुमन (UPSC Success Story)
अंशुमन राज याने अतिशय साध्या कुटुंबात जन्म घेतला आहे. ते ज्या ठिकाणी राहायचे तेथे कायमच सोयी सुविधांचा अभाव होता. UPSC परीक्षेची तयारी त्यांनी अत्यंत मेहनतीने आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने पास केली आहे.

UPSC Success Story of IAS Anshuman Raj

दोनवेळा क्रॅक केली UPSC
विशेष म्हणजे अंशुमनने कोणतेही कोचिंग क्लास न लावता केवळ सेल्फ स्टडी करुन अभ्यास केला आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. या परिक्षेत मिळवलेल्या  रँकनुसार त्याला IRS पद देण्यात आले होते. या पदावर त्याचे समाधान झाले नाही म्हणून त्याने (UPSC Success Story) पुन्हा परीक्षा देण्याचा विचार केला. अंशुमनला IAS अधिकारी बनायचं होतं. पहिली परीक्षा पास झाल्यानंतर त्याने सलग दोनदा UPSCची परीक्षा दिली, पण या दोन्ही प्रयत्नात त्याला अपयश आले. मात्र खचून न जाता त्याने तयारी सुरुच ठेवली. 2019 मध्ये त्याने पुन्हा एकदा चौथ्या प्रयत्नात कुठलेही कोचिंग क्लासेस न लावता उत्तीर्ण केली आणि संपूर्ण भारतात 7वी  रँक मिळवून IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com