UPSC Success Story : 7वीत असताना पाहिलं स्वप्न; जिद्दीने क्रॅक केली UPSC; कनिकाने भारतात मिळवली 9वी रॅंक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 7वी मध्ये असताना कनिका (UPSC Success Story) गोयलने UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि दहा वर्षांनंतर तिने तिचे स्वप्न पूर्ण केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2022 च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला आणि हरियाणातील कैथल येथील मॉडेल टाउनच्या कनिका गोयलने संपूर्ण भारतातून 9 वा क्रमांक मिळवला आहे. कनिका तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे.

7 वीत असताना पाहिले स्वप्न
कनिकाने सांगितले की, “जेव्हा मी 7वीत होते तेव्हा IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. 12वीनंतर मी माझे ध्येय गाठण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले. परीक्षेच्या (UPSC Success Story) दुसऱ्याच प्रयत्नात मी संपूर्ण भारतात टॉप केले आहे. मी एकुलती एक मुलगी असल्याने माझ्या आई-वडिलांनी माझ्याकडूनच सर्व अपेक्षा होत्या आणि त्या मी पूर्ण केल्यामुळे मी आणि माझे कुटुंब खूप आनंदी आहे.”
हे यश अपेक्षित नव्हतं
कनिका सांगते; “UPSCच्या टॉप 10 यादीमध्ये स्वतःचे नाव पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. या यादीत माझे नाव येईल याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. जेव्हा निकाल आला तेव्हा मी तो दोन ते तीन वेळा तपासला. या यादीत माझे नाव 9 व्या क्रमांकावर आले आहे. तब्बल दहा वर्षांच्या तयारीनंतर मी माझे ध्येय गाठले आहे.”

आई-वडिलांना यशाचे श्रेय (UPSC Success Story)
इयत्ता 7वी मध्ये शिकत असताना कनिकाने UPSC ची तयारी करुन परीक्षा क्रॅक करण्याचा निर्णय घेतला. तिचे ध्येय पूर्ण करण्यसाठी तिच्या आई-वडिलांनी तिला नेहमीच पाठिंबा दिल्याचे ती सांगते. तिने तिच्या यशाचे सर्व श्रेय तिच्या आई-वडिलांना दिले आहे.
आव्हानांना सामोरे जावे लागले
कनिका पहिल्या परीक्षेत पास होवू शकली नाही आणि हा तिच्यासाठी मोठा धक्का होता. पण, तिने तिची तयारी कायम ठेवली आणि दुसऱ्या प्रयत्नात ती नुसती पास झाली नाही; तर ती या परिक्षेत टॉपर ठरली. कनिका म्हणते, “मला अपयश आल्यानंतर मी खचून न जाता ताकदीने अपयशाचा सामना केला. माझा स्वतःवर विश्वास होता त्यामुळे अपयशाचा माझ्यावर परिणाम झाला नाही आणि मी पुन्हा एकदा तयारी सुरु केली.”

अशी केली तयारी
कनिका म्हणते, “मी माझ्या वेळेचे योग्य नियोजन केले. अभ्यास आणि विश्रांतीमध्ये संतुलन ठेवले. जर तुम्ही सातत्यपूर्ण आणि हुशारीने काम केले तर तुम्ही कोणत्याही (UPSC Success Story) परीक्षेत यश मिळवू शकता. सतत अभ्यास करत असताना जेवण्यासाठी आणि विश्रांतीसाठी वेळ काढणं देखील महत्वाचं आहे.”
तरुण उमेदवारांना सल्ला 
“कष्ट करत राहा, कौशल्याने काम करा. तुमच्यात उत्साह असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तुम्हाला कोणत्याही टप्प्यावर अपयश आले तरी न थांबता पुढे जा. पुढच्या वेळी तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल; असं कनिका म्हणते.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com