करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेले (UPSC Success Story) उमेदवार देशात स्वतःची ओळख निर्माण करतात. यावर्षी UPSC नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर संपूर्ण देशातून 933 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. निकाल जाहीर होताच, यूपीच्या हापूर जिल्ह्यातील आशना चौधरीच्या नावाची वेगळीच चर्चा झालेली पहायला मिळाली. तिला ‘ब्युटी विथ ब्रेन’ म्हणून ओळखले जाते. आज आपण आशनाविषयी जाणून घेणार आहोत.
आशना चौधरी उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. यावर्षी तिला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 992 गुण मिळाले आहेत. दिल्ली पब्लिक स्कूल गाझियाबाद येथून तीने शालेय शिक्षण घेतले आहे.
आशना चौधरी उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील पिलखुवा (UPSC Success Story) येथील रहिवासी आहे. तिचे शालेय शिक्षण गाझियाबादच्या दिल्ली पब्लिक स्कूलमधून झाले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये इंग्रजी ऑनर्सच्या अभ्यासासाठी तीने प्रवेश घेतला.
तिला सुरुवातीपासूनच समाजसेवेची इच्छा होती. तीने एका एनजीओसाठीही काम केले आहे. या माध्यमातून तीने समाजातील वंचित मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली आहे. आशना (UPSC Success Story) एका श्रीमंत कुटुंबातून आली आहे. तिच्या कुटुंबातील बहुतांश सदस्य पीएचडीधारक आहेत. त्यांचे वडील अजित चौधरी हेही प्राध्यापक आहेत.
आशना UPSC च्या तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाली आहे. 2020 मध्ये तिने पहिला प्रयत्न केला पण प्रिलियममध्ये ती पास होऊ शकली नाही. असे असूनही तीने न खचता (UPSC Success Story) अभ्यास सुरु ठेवला. यावर्षी UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या अंतिम निकालात आशना चौधरीचेही नाव झळकले आहे. यावेळी आशनाला 116 वा क्रमांक मिळाला आहे.
आशना सोशल मीडियावर खूप सक्रिय (UPSC Success Story) असते. इंस्टाग्रामवर तीचे 71.6 हजार फॉलोअर्स आहेत. एका मुलाखतीत तीने UPSC क्रॅक करण्याच्या टिप्सबद्दल सांगितले आहे. तीने यूपीएससीसाठी कोणतेही कोचिंग घेतले नाही. ती रोज 4 ते 8 तास अभ्यास करायची. मन स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी ती फनी व्हिडिओ पहायची.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com