Become a Yoga Instructor : योग क्षेत्र ठरेल करिअरचा उत्तम पर्याय; कसं व्हायचं ‘योगा ट्रेनर’? कुठे आहे नोकरीची संधी? वाचा सर्वकाही

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी पास झाल्यानंतर आणि (Become a Yoga Instructor) ग्रॅज्युएशन करत असताना अनेकजण करिअरचे वेगवेगळे पर्याय शोधत असतात. अशा तरुणांसाठी आम्ही आज योग क्षेत्रातील करिअरविषयी माहिती देणार आहोत. तुम्हाला माहित आहे का… योग क्षेत्रात यूजी, पीजी किंवा डिप्लोमा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला उत्तम नोकरी मिळू शकते. या काळात शाळा, विद्यापीठे, कॉलेज तसेच रुग्णालयांमध्येही योग शिक्षकांची मागणी वाढताना दिसत आहे.

Become a Yoga Instructor

उत्तम आरोग्यासाठी लोकांमध्ये जागरुकता वाढली आहे. अनेक जणांनी योगासनाला आपल्या दिनचर्येचा भाग बनवला आहे. योग किंवा योगासनांची  क्रेझ वाढताना दिसत आहे. दरवर्षी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या ज्या वेगाने योगाचा विस्तार होत आहे, ते पाहता येत्या काळात या क्षेत्रातील नोकऱ्यांची मागणीही बरीच वाढत असल्याचे दिसून येत आहे.
तुम्हाला योगाची आवड असेल आणि या क्षेत्रात करिअर करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी देश-विदेशात करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. योग हे असे माध्यम आहे, ज्यामुळे (Become a Yoga Instructor) जगभरातील लाखो लोक हे नैसर्गिकरित्या निरोगी झाले आहेत. अनेकांना योगाची मदत झाली आहे. यामुळे आजच्या घडीला मोठमोठ्या संस्थांमध्ये योग शिक्षकांना मोठी मागणी मिळताना दिसत आहे. योग क्षेत्रातील अभ्यासक्रम काय आहे, आणि त्या क्षेत्रात नोकरीची किती व कशी संधी आहे; हे आपण पाहणार आहोत.

Become a Yoga Instructor

12वी नंतर करु शकता हे कोर्स (Become a Yoga Instructor)
योग क्षेत्रातील शिक्षण देणाऱ्या अनेक मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आणि डिप्लोमा प्रोग्राम चालवले जात आहेत. त्याचबरोबर अनेक सर्टिफिकेट कोर्सही उपलब्ध आहेत. जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्ही पुढील कोर्स करू शकता.
1. BSc in Yoga
2. BA in Yoga
3. MA in Yoga
4. MSc in Yoga
5. UG Diploma in Yoga
6. PG Diploma in Yoga
7. Certificate Course in Yoga
8. Yoga Teacher Training Course (TTE)
9. B.Ed in Yoga

Become a Yoga Instructor

योगासाठी भारतातील काही प्रसिद्ध संस्था
1. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ योग एन्ड नेचुरोपैथी, नई दिल्ली
2. राजर्षि टंडन ओपन विश्वविद्यालय, उत्तर प्रदेश
3. देव संस्कृति यूनिवर्सिटी, हरिद्वार, उत्तराखंड
4. यूनिवर्सिटी ऑफ राजस्थान (Become a Yoga Instructor)
5. वर्धमान महावीर ओपन यूनिवर्सिटी, राजस्थान
6. श्री लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विश्वविद्यालय, नई दिल्ली
7. बिहार योग विद्यालय

 

Become a Yoga Instructor

या क्षेत्रात मिळू शकते नोकरी
योग क्षेत्रात यूजी, पीजी किंवा डिप्लोमा कोर्स केल्यानंतर तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकता. आजकाल सर्रास  शाळांमध्ये योग शिक्षक, जिममध्ये योग ट्रेनर, हेल्थ रिसॉर्टमध्ये ट्रेनर तसेच रिसर्चर या पदांसाठी भरती केली जात आहे. त्याशिवाय रुग्णालयामध्ये रुग्णांवर (Become a Yoga Instructor) उपचार करण्यासाठीही योग शिक्षकांची मागणी वाढू लागली आहे. यासाठी काही हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
अनेक आरोग्य केंद्रे, गृहनिर्माण संस्था आणि कॉर्पोरेट जगतातही योग प्रशिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. याशिवाय एरोबिक्स इन्स्ट्रक्टर, योग थेरपिस्ट आणि निसर्गोपचारक म्हणूनही काम करता येते. अनेक विद्यापीठांमध्ये योग हा अनिवार्य विषय म्हणूनही समाविष्ट करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com